Success Story : टोमॅटो पिकासाठी ‘हे’ तंत्रज्ञान वापरा; शेतकऱ्याचा अनुभवातून सल्ला!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेचा असर आता भारतीय शेतीमध्ये (Success Story) पाहायला मिळत आहे. देशातील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत ‘स्मार्ट शेती’ करण्याकडे भर देत आहे. अनेक शेतकरी सध्या शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करत आहे. हरियाणातील करनाल येथील शेतकरी प्रदीप कुमार यांनीही आपल्या टोमॅटो शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. कुमार यांनी आपल्या टोमॅटोच्या शेतामध्ये हवामान आधारित रिमोट सेन्सिंग प्रणाली बसवली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून त्यांना घरबसल्या आपल्या टोमॅटोच्या पिकावर किडीचा झालेला प्रादुर्भाव, हवामानाचा अंदाज, पिकाला किती प्रमाणात (Success Story) पाण्याची गरज आहे, याशिवाय फवारणीबाबत माहिती मिळत आहे.

एआय टूलची विशेषता (Success Story Of Artificial Intelligence In Farming)

प्रदीप कुमार यांनी एका कंपनीच्या माध्यमातून हे एआय टूल आपल्या टोमॅटो शेतामध्ये (Success Story) बसवले आहे. ज्यामुळे त्यांना घरबसल्या टोमॅटो पिकाबाबत सर्व माहिती समजू शकत आहे. कॅमेरा असलेले या एआय टूलची विशेषता म्हणजे ते टोमॅटोवरील फुलकिडींचा फोटो थेट कृषी कंपनीच्या तज्ज्ञांकडे पाठवते. ज्यामुळे प्रदीप यांना टोमॅटोवर कोणत्या परिणामकारक औषधाची फवारणी करावी याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळते. हे एआय टूल वातावरणातील बदलांचे अवलोकन करून आगाऊ सूचना प्रदान करते तसेच टोमॅटो पिकाला किती प्रमाणात पाणी देण्याची गरज आहे. याची माहितीही प्रदीप यांना घरबसल्या मिळत आहे.

उत्पादन खर्चात घट

प्रदीप कुमार यांनी आपल्या टोमॅटो पिकात पिवळे किडीनाशक सापळेही लावले असून, ज्यामुळे त्यांच्या फवारणीचा खर्चही बऱ्याच प्रमाणात (Success Story) कमी झाला आहे. टोमॅटो शेतीमधील आधुनिक प्रयोगांमुळे त्यांच्या उत्पादन खर्चात कपात झाली असून, त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. कीटकनाशकांच्या कमी वापरामुळे त्यांच्या मालाला भावही चांगला मिळत असल्याचे ते सांगतात. मागील काही वर्षांपासून स्मार्ट शेतीचा अवलंब केल्याने त्यांचा उत्पादन खर्च कमी झाला असून, आवश्यक त्याच गोष्टी ते टोमॅटो पिकाला देत आहे. ज्यामुळे उपलब्ध बाजारभावानुसार आपल्याला एकरी 3 ते 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे प्रदीप कुमार सांगतात. त्यामुळे प्रदीप कुमार शेतीमध्ये नव्याने येऊ पाहणाऱ्या आपल्या संपर्कात येणाऱ्या तरुणांना स्मार्ट शेती करण्याचा सल्ला देत आहे.

टोमॅटो पिकासाठी प्रभावी वापर

एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी बचत होऊन, ते आपल्या उत्पन्नात वाढ करू शकतात. या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीमध्ये कीटकनाशकांचा केवळ आवश्यकतेनुसार वापर होऊन, देशातील नागरिकांचा आहार शुद्ध आणि आरोग्यवर्धक (Success Story) होऊ शकतो. टोमॅटो या पिकासाठी या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जाऊ शकतो. टोमॅटो पिकाला फुलकिडी, फळकिडी आणि अन्य किडींच्या प्रादुर्भावाचा मोठा धोका असतो. ज्यामुळे योग्य मार्गदर्शना अभावी शेतकरी सतत फवारणी करत राहतात. परिणामी त्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होते. मात्र या एआय टूलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विशिष्ट औषधेच फवारणी करावी लागत आहे. ज्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात या तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठी वाढ होऊ शकते, असे कृषी क्षेत्रातील जाणकारांकडून सांगितले जात आहे.

error: Content is protected !!