Success Story : माळरानावर मिरची लागवड; बीडच्या पोलिसाची 2 एकरात लाखोंची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक भागामध्ये शेतीमध्ये नवनवीन (Success Story) लोक येताना दिसत आहे. विशेष म्हणजे काही लोक गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेतीमध्ये येत आहे. तर काही लोक सेवानिवृत्तीनंतर आवड म्हणून शेती करत आहे. मात्र, त्यातून शेतीमध्ये नव्याने येणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे. आज आपण अशाच एका सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी आपल्या सेवा निवृत्तीनंतर शेतीची वाट धरत, माळरानावर मिरची पिकाची लागवड केली आहे. ज्यातून त्यांना जवळपास 11 लाखोंचे उत्पन्न अपेक्षित (Success Story) असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

निवृत्तीनंतर धरली शेतीची वाट (Success Story Of Chilli Farming)

सुभाष कराड असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील (Success Story) तपोवन गावचे रहिवासी आहे. महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झालेल्या सुभाष कराड यांची तपोवन या गावी वडिलोपार्जित जमीन आहे. त्यातील आपल्या 2 एकर जमिनीमध्ये त्यांनी यावर्षी मिरचीचे पीक घेतले. 2023 मध्ये डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सुभाष कराड यांनी आपल्या शेतीमध्ये 2 एकरात 20 हजार मिरचीच्या रोपांची मल्चिंग पेपर आणि ठिबक व्यवस्था करून लागवड केली. मिरची लागवडीसाठी ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर, खते, पाणी, मजुरी व फवारणीसाठी त्यांना एकूण दोन लाख रुपयांचा खर्च आला आहे.

पिकासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

शेतकरी सुभाष कराड यांनी मिरची लागवडीदरम्यान तज्ज्ञांचे मार्गदर्शन (Success Story) घेतले. यात त्यांनी प्रामुख्याने मशागत, खते, पाणी व कीड नियंत्रण याबाबत वेळोवेळी स्थानिक कृषी विभागाचे मार्गदर्शन घेतले. परिणामी, त्यांच्या शेतामध्ये सध्या मिरचीची झाडे तीन फुटांपर्यंत वाढली असून, झाडांना मोठ्या प्रमाणात मिरची लगडलेल्या आहेत. एका झाडाला कमीत कमी अडीचशे ग्रॅम मिरची निघेल, असा दावा शेतकरी सुभाष कराड करत आहे.

11 लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा

दरम्यान, शेतकरी सुभाष कराड यांच्या म्हणण्यानुसार, प्रति झाड कमीत कमी अडीचशे ग्रॅम मिरची याप्रमाणे त्यांना दोन एकरात एकूण पाच टन लाल मिरचीचे उत्पादन मिळण्याची आशा आहे. ज्यातून त्यांना सध्याच्या बाजारभावानुसार मिरची पिकातून जवळपास 11 लाखांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर शेती मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने शेतीमध्ये अडकून न पडता आधुनिक पद्धतीने पिकांची लागवड करून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेणे आवश्यक आहे, असा सल्ला त्यांनी शेवटी शेतकऱ्यांना दिला आहे.

error: Content is protected !!