Success Story : अंध जोडप्याने शोधली, शेतीतून प्रकाशवाट; प्रगतिशील शेतकऱ्यालाही लाजवेल अशी शेती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : एखाद्या व्यक्तीने ठरवले तर तो काहीही (Success Story) करू शकतो. अगदी कोणत्याही क्षेत्रामध्ये अतिउच्च पातळी गाठून, स्वतःला सिद्ध करत यशाला गवसणी घालू शकतो. त्यासाठी माणसामध्ये प्रबळ इच्छाशक्ती असणे आवश्यक असते. नाशिक जिल्ह्यातील निफाडच्या दावचवाडी येथील दृष्टिहीन (अंध) शेतकरी पांडुरंग धुमाळ यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. दृष्टिहीन (अंध) असूनही, त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आपली द्राक्ष आणि टोमॅटोची शेती यशस्वीपणे करून दाखवली आहे. आज आपण शेतकरी पांडुरंग धुमाळ यांची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत.

कायमस्वरूपी डोळे गमावले (Success Story Blind Couple Farming)

शेतकरी पांडुरंग धुमाळ यांची नाशिक जिल्ह्यातील निफाडच्या दावचवाडी येथे स्वतःची वडिलोपार्जित शेती आहे. मात्र, काही कारणास्तव त्यांना 2001 मध्ये आपले डोळे गमवावे लागले. ज्यामुळे त्यांनी आपली दृष्टी कायमस्वरूपी गमावल्याने, त्यांच्या आयुष्याच्या पुढील वाटचालीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. मात्र अशा परिस्थितीतही शेतकरी पांडुरंग धुमाळ डगमगले नाही. त्यांनी डोळ्यांनी दिसत नसतानाही आईच्या मदतीने शेतीमध्ये, स्वतःची नवीन प्रकाशवाट निर्माण (Success Story) केली. विशेष म्हणजे पांडुरंग यांच्या पत्नी सविता या देखील अंध असून, त्यांनाही डोळ्यांनी दिसत नाही. मात्र, आज हे दृष्टिहीन जोडपे एखाद्या प्रगतिशील शेतकऱ्याला लाजवेल. इतक्या शिताफीने आपली फळबाग शेती सांभाळत आहे.

शेती करताय ही अभिमानाची गोष्ट

आजच्या शेतकरी यशोगाथेमध्ये आपण “किती मिळतंय उत्पन्न” हा परिच्छेद देणार नाही. कारण शेतकरी पांडुरंग धुमाळ आणि त्यांच्या पत्नी सविता हे दोघेही डोळ्यांनी दिसत नसताना शेती करत आहेत. हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या दोन एकरात क्षेत्रात द्राक्ष बाग सांभाळत आहेत. इतकेच नाही तर आपल्या अन्य जमिनीमध्ये टोमॅटो, कांदा अशी हंगामी पिके देखील घेत आहेत. शेतीमध्ये उत्पादन खर्च महागला असला तरी आपण यशस्वीपणे शेतीचे आर्थिक गणित सांभाळत असल्याचे शेतकरी पांडुरंग धुमाळ सांगतात.

शेतीत पत्नीचीही साथ

पत्नी सविता यांना सुरुवातीला शेतीतील कामे जमत नव्हती. मात्र, पांडुरंग हे जन्मापासून शेतीत असल्याने त्यांना शेती करण्याचा पूर्ण अनुभव आहे. ज्यामुळे पांडुरंग यांच्या मदतीने सविता यांनी देखील शेतीत पाय ठेवला. आणि पतीच्या शेतीतील यशाला आज मोठा हातभार लावला आहे. दोघेही शेतीतील सर्व कामे करतात. त्यांना आपण अंध असल्याची अडचण शेतीत काम करताना जाणवत नाही. ते सर्वसामान्य शेतकरी जसे शेतात सर्व कामे करतो. अगदी त्याच पद्धतीने सर्व कामे करतात. पांडुरंग यांच्या सिंधूबाई या दोघांना वेळोवेळी गरज पडल्यास मदत व मार्गदर्शन करतात. या दोघांना एक पाच वर्षांचा मुलगा देखील आहे.

तरुण पिढीसमोर मोठा आदर्श

आजकाल ग्रामीण भागातील अनेक तरुण शेतीपासून दूर जात शहरांची वाट धरत आहेत. मात्र अशा तरुणांसाठी या दृष्टिहीन जोडप्याची शेती म्हणजे मोठा आदर्श ठरणार आहे. कारण 100 टक्के दिसत नसतानाही एखाद्या बागाईतदाराप्रमाणे शेती करणे ही तितकीशी सोपी गोष्ट नाहीये. जी शेतकरी पांडुरंग धुमाळ आणि त्यांच्या पत्नी सविता धुमाळ यांनी करून दाखवली आहे. त्यांची ही यशोगाथा (Success Story) शेतकऱ्यांना शेतीमध्ये नव्याने उभारी घेण्यासाठी नक्कीच प्रेरणा देणारी ठरणार आहे.

error: Content is protected !!