Success Story : शिमला मिरचीच्या शेतीतून शेतकरी मालामाल; करतोय लाखोंची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी सध्या पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीची (Success Story) कास धरत आहेत. त्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात फायदाही होत असून, त्यांची आर्थिक स्थिती (Success Story) सुधारण्यासाठी मोठा हातभार लागत आहे. आज आपण अशाच एका आधुनिक पद्धतीने (पॉलीहाऊस) शिमला मिरचीची लागवड करण्याऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत.

हरियाणातील कर्नाल येथे राहणारे पवन हे अनेक वर्षांपासून हरितगृह (पॉलीहाऊस) पद्धतीने शेती करत आहे. काकडीशिवाय त्यांनी आता आपल्या शेतामध्ये आधुनिक पद्धतीने शिमला मिरचीची (Success Story) लागवड केली आहे. शिमला मिरचीपासून त्यांना प्रति नेट हाऊस 5 लाखांपेक्षा जास्त नफा मिळत आहे. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांच्या कधीएवढीतच त्यांनी शिमला मिरची पिकातून लाखो रुपयांची कमाई केली आहे.

किती मिळतोय नफा? (Success Story of Capsicum Farming In Polyhouse)

शेतकरी पवन यांनी सांगितले की, ते अनेक वर्षांपासून पॉलीहाऊसच्या माध्यमातून शेती करत आहेत. काकडींशिवाय आता त्यात रंगीबेरंगी शिमला मिरचीची लागवड केली आहे. सिमला मिरचीपासून त्यांना प्रति नेट हाऊस 5 लाख रुपये नफा मिळत आहे. जर दर योग्य असेल तर हा नफा 10 लाख रुपयांपेक्षा जास्त होणार आहे. विविध रंगी शिमला मिरचीला बाजारात मोठी मागणी आहे. त्याचे दरही बाजारात चांगले आहेत. तसेच शिमला मिरचीचा उत्पादन खर्च वजा केल्यास त्यातून बराच नफा मिळतो. पवन यांनी ऑगस्ट महिन्यात शिमला मिरचीची लागवड सुरू करतात. 15 नोव्हेंबरपासून काढणी सुरू होते. ती फेब्रुवारी-मार्चपर्यंत सुरू राहते. त्यांनी आपल्या शेतात ठिबक पद्धतीने शिमला मिरचीला पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते. असेही पवन यांनी सांगितले आहे.

सरकारकडून मिळते अनुदान?
शिमला मिरचीची लागवड फायदेशीर असल्याचे सांगताना पवन पुढे म्हणतात, पूर्वी सरकारकडून पॉलीहाऊस उभारण्यासाठी 65 टक्के अनुदान मिळत होते. आता ते 50 टक्के करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना भाजीपाला पिकवायचा असेल तर पॉलीहाऊससारख्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करावा. अल्प प्रमाणात असले तरी शेतकर्‍यांना त्यांचा नफा वाढविण्यास त्यातून खूप मदत होणार आहे, असेही पवन यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!