Success Story : मिश्र शेतीतून वार्षिक 20 लाखांची कमाई; करार शेतीचे अनोखे उदाहरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सध्या अनेक शेतकरी मिश्र शेती पद्धतीचा (Success Story) वापर करून, मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. मात्र भाडेतत्वावर जमीन घेऊन मिश्र शेतीद्वारे वार्षिक 20 लाखांची कमाई (Success Story) करण्याबाबत तुमच्या ऐकिवात आले नसेल. उत्तरप्रदेशातील वाराणसी येथील धर्मेंद्र सिंह यांनी भाड्याने 14 एकर जमीन घेऊन (करार पद्धतीने) आपल्या शेतीत जरबेरा फुलाची लागवड केली आहे. यासोबतच त्यांनी केळी, स्ट्रॉबेरी, पपई, ड्रॅगन फ्रुट आणि भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे केवळ एक एकर शेती असून, सर्व मिळून 16 एकर शेतीतून ते वार्षिक 20 लाखांची कमाई करत आहे.

वाराणसी येथील उनौला गावाचे धर्मेंद्र सिंह हे मिश्र शेतीचे मोठे उदाहरण आहे. त्यांनी आपल्या शेतात 16 एकरात जरबेरा फुलाची, केळी, स्ट्रॉबेरी, पपई, ड्रॅगन फ्रुट आणि भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. त्यांच्या शेतीतील उत्पादित होणारी सर्व फळे आणि भाजीपाला हा काठमांडू आणि फरीदाबादसह आसपासच्या परिसरातील रिलायंस मॉलला पाठवला जातो. शुद्ध तेलाला मागणी असल्याने ते आपल्या शेतात मोहरीचे आंतरपीक घेतात. यात त्यांच्याकडे केवळ एक एकर शेती आहे, उर्वरित सर्व शेती त्यांनी भाडेतत्वावर घेतली आहे. या एकत्रित पिकांच्या माध्यमातून 16 एकरात वर्षाला त्यांना जवळपास खर्च वजा जाता 20 लाखाची कमाई होते.

बाजारातील मागणीनुसार शेती (Success Story Of Contract Farming)

सरकारकडून शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारच्या योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, त्यासाठी स्थानिक कृषी विभागामध्ये बिनदिक्कतपणे चौकशी करावी. आपण अनुदानाच्या माध्यमातून ट्रॅक्टर, सिंचन संच (ड्रीप) आणि पॉलिहाऊससाठी सरकारच्या योजनांचा लाभ घेतला असून, ड्रीपसाठी त्यांना 90 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळाल्याचे ते सांगतात. स्ट्रॉबेरी प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी उत्तम असते. तिच्यामध्ये सी जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय आपण ड्रॅगन फ्रुटची लागवड केली असून, या फळाची एकदा लागवड केल्यानंतर आपल्याला मोठ्या कालावधीपर्यंत उत्पन्न मिळते. त्यामुळे उच्चभ्रू लोकांकडून मागणी असलेल्या फळांच्या लागवडीवर आपण भर दिल्याचे ते सांगतात.

12 जणांना कायमस्वरूपी रोजगार

आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक पद्धतीने शेती केल्यास नक्कीच यश मिळते. शिक्षणानंतर सरकारी नोकरी आणि खासगी नोकरीच्या मागे न लागता तरुणांनी मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्रात यावे, असे ते आवर्जून सांगतात. सुमारे दीड दशकापासून धर्मेंद्र मिश्र शेती करत असून, त्यांनी आपल्या शेतात काम करण्यासाठी 7 महिला आणि 5 पुरुषांना नेहमीसाठी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. खर्च वजा जाता आपण वार्षिक 20 लाखांची कमाई करत आहोत, असे ते सांगतात..

error: Content is protected !!