Success Story : दुसऱ्याच्या शेतात पानकाकडीची लागवड; 2 महिन्यात कमावला 75 हजाराचा नफा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींना (Success Story) सामोरे जावे लागते. मात्र, त्यातही स्वतःची शेती नसताना दुसऱ्याचे शेत वाट्याने घेऊन शेती करणे तितकेसे सोपे नसते. मात्र, राज्यात असे बरेच शेतकरी आहेत. ज्यांची कोणतीही शेती नसताना, ते दुसऱ्यांची शेती वाट्याने घेऊन आपले आयुष्य आर्थिकदृष्ट्या समृद्ध करत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी यंदाच्या उन्हाळ्यात दीड बिघा शेती ३० हजारांना तोडून घेत, त्यात पानकाकडीची लागवड (Success Story) केली. ज्यातून त्यांनी दोनच महिन्यात खर्च वजा जाता ७० ते ७५ हजार रुपये कमावले आहे.

दीड महिन्यात तोडणी सुरु (Success Story Cucumber Cultivation)

सागर भोई असे या तरुण व जिद्दी शेतकऱ्याचे नाव आहे. सागर हा मूळचा खानदेशातील मात्र, त्याने नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावात दीड बिघा जमीन कसण्यासाठी घेतली आहे. या जमिनीत सागरने यंदाच्या उन्हाळ्यात पानकाकडीची लागवड (Success Story) केली. जानेवारी महिन्यात लागवडीनंतर त्याला साधारणपणे सव्वा ते दीड महिन्यात फेब्रुवारीच्या शेवटी काकडीचे उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली. ज्यामुळे तो गेल्या दीड महिन्यापासून तो काकडीची तोडणी करून, स्वतः नाशिकमध्ये आपल्या काकडीची थेट विक्री करतो आहे. ज्यामुळे त्याला दररोज ताजा पैसा मिळत आहे. याशिवाय उन्हाळाभर काकडी पिकावर घेतलेल्या कष्टातून चांगली कमाई मिळत असल्याने, त्याला आत्मिक समाधान देखील मिळत असल्याचे तो सांगतो.

किती मिळतोय दर?

जिद्दी शेतकरी सागर भोई सांगतो, आपण स्वतः सकाळी काकडी तोडतो. त्यानंतर मोटारसायकल नाशिक शहरातील बाजारात नेऊन, दिवसभरात हातविक्रीने आपल्या पानकाकडीची विक्री करतो. आपली काकडीचा तोडा शेवटाला आला असून, त्यास आपल्याला आतापर्यंत सरासरी १०० ते १२० रुपये प्रति किलोचा दर मिळाला आहे. पानकाकडी ही स्थानिक गावठी काकडी असल्याने तिची चव उत्तम असते. ज्यामुळे तिच्याकडे ग्राहकांचा ओढा अधिक असल्याने,
हातोहात केव्हा तिची विक्री होते. हेही लक्षात येत नसल्याचे तो सांगतो.

किती मिळाले उत्पन्न?

गेल्या दोन महिन्यात सागरने आपल्या पानकाकडीचे ३ ते ४ दिवसांच्या अंतराने तोडे करत, आतापर्यंत दीड महिन्यात १.२५ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. यात शेतमालकाला जमिनीचे ३० हजार रुपये आणि काकडी लागवडीसाठीचा एकूण खर्च २० हजार रुपये असे एकूण ५० हजार रुपये खर्च वजा त्याला ७० ते ७५ हजार रुपये उत्पन्न सहज मिळाल्याचे तो सांगतो. त्यामुळे आता सागरची जिद्दीने शेती करण्याची उमेद, नव्याने शेतीमध्ये पाहू तरुण शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

error: Content is protected !!