Success Story : 16 गुंठ्यात शेवगा लागवड; भाजीपाला, ज्वारी आंतरपिकांतूनही साधली प्रगती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक शेतकऱ्यांकडे सध्या जमिनीचे क्षेत्र (Success Story) हे खूपच कमी होत चालले आहे. ज्यामुळे शेतकरी आपल्या शेतीमध्ये एकापेक्षा अधिक पिकांचे उत्पादन घेण्याला प्राधान्य देत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना अशा मिश्र पीक पद्धतीतून अधिकचे उत्पन्न देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी आपल्या 16 गुंठे जमिनीमध्ये शेवगा लागवड कारण्यासोबतच त्यात आंतरपिके घेऊन, आपली आर्थिक प्रगती (Success Story) साधली आहे.

‘ओडिसी टू’ जातीची निवड (Farmer Success Story)

अभिषेक महावीर मगदूम असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, ते सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कवठे एकंद गावचे रहिवासी आहे. त्यांनी आपल्या आपल्या 16 गुंठे शेतीमध्ये (Success Story) गेल्या वर्षीच्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये 1 जूनला ‘ओडिसी टू’ या जातीच्या शेवगा बियाण्याची लागवड केली. साधारणपणे त्यांनी 16 गुंठे क्षेत्रामध्ये एकूण 180 झाडे बसवली आहेत. यासाठी त्यांनी दोन झाडातील अंतर 8 फूट लांब व 5 फूट रुंद इतके ठेवले.

किती मिळतंय उत्पादन?

दरम्यान, 10 ते 11 महिन्याच्या कालावधीनंतर त्यांचे शेवगा पीक काढणीला आले आहे. गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी तोडा घेतला असून, त्यातून त्यांना 35 किलो उत्पन्न मिळाले आहे. ज्यास त्यांना मुंबई मार्केटला 16 रुपये इतका दर मिळाला आहे. तर दुसऱ्या-तिसऱ्या तोड्यात 70 किलोपर्यंतचे सरासरी उत्पादन आले. आठवड्यातून एक तोडा होऊन महिन्याला साधारणपणे 200 किलो सध्या शेंगा निघतात. असे शेतकरी अभिषेक मगदूम सांगतात.

किती मिळणार उत्पन्न?

याशिवाय शेवगा शेंगांना स्थानिक बाजारपेठेतील थेट ग्राहकांना विक्री केल्यास दहा रुपये 4 शेंगा अशी विक्री होत असल्याचे ते सांगतात. दरम्यान, योग्य पाणी व व्यवस्थापन झाल्यास आठवड्याला 200 किलोपेक्षा अधिकची वाढ होऊन, यंदा शेवगा पिकातून त्यांना एक लाख ते दीड लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळू शकेल, अशी अपेक्षा शेतकरी अभिषेक मगदूम यांनी व्यक्त केली आहे.

आंतरपिकांतूनही आर्थिक फायदा

शेतकरी अभिषेक महावीर मगदूम यांनी आपल्या 16 गुंठे जमिनीमध्ये शेवगा पिकात वर्षभरात कोथिंबीर, मेथी भाजी असे गरजेनुसार भाजीपाला उत्पादन घेतले. तसेच शाळूचे पिके घेऊन 2 क्विंटल ज्वारी व चाराही उत्पादित केला. शेवगा झाडे मोठी होईपर्यंत त्यामध्ये मेथी, कोथिंबीर, पालक अशी वाफ्याद्वारे पालेभाजी पिके त्यांनी घेतली. झाडांमध्ये अंतर असल्यामुळे आंतरपिके घेण्यास मदत झाली. शेवगा संगोपनासाठी बरोबरच भाजीपाल्याचे पीक हे चांगले आले. साधारपणे भाजीपाल्यातून त्यांना 12 ते 15 हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.

error: Content is protected !!