Success Story : एक बिघ्यात कोथिंबीर लागवड; शेतकऱ्याची महिन्याला एक लाखाची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देत, आधुनिक पद्धतीने शेती (Success Story) करण्याकडे आपला कल वळवत आहे. त्यातही शेतकरी आधुनिकतेसह जैविक पद्धतीचा अवलंब करत असल्याने, शेतकऱ्यांना शेतीतून मोठे आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत होत आहे. आज आपण अशाच आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी कोथिंबीर लागवडीतून मागील वर्षभरात मोठी आर्थिक प्रगती साधली आहे. विशेष म्हणजे गेल्या 10 वर्षांपासून ते कोथिंबिरीची शेती करत असून, ते वार्षिक मोठी कमाई (Success Story) करत आहे.

वर्षभर कोथिंबीर पिकावर भर (Success Story Cultivation Of Coriander)

सुनील कुमार पाल असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तरप्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील अमानाबाद गावचे रहिवासी आहेत. सुनील कुमार पाल हे दशकभरापासून कोथिंबीरची लागवड (Success Story) करत आहेत. विशेष म्हणजे ते संपूर्ण वर्षभर टप्प्याटप्प्याने आणि शेतीची फेरपालट करत कोथिंबिरीची लागवड करत असून, त्यांच्या शेतात उत्पादित कोथिंबीर व्यापारी थेट त्यांच्या बांधावर येऊन खरेदी करत आहेत. ज्यामुळे त्यांना वाहतूक खर्चात देखील बचत होत आहे. तर वर्षातील काही दिवस ते कोथिंबिरीपासून धनाचे उत्पादन देखील घेतात. त्यातूनही त्यांना कमाई अतिरिक्त कमाई होते.

जैविक पद्धतीने उत्पादन

सुनील कुमार पाल सांगतात, “लागवडीपूर्वी आपण शेताची चांगली मशागत (Success Story) करून, त्यात शेणखताची मात्रा देतो. हे शेणखत संपूर्ण मातीमध्ये चांगले मिसळून घेतो. त्यानंतर बियाण्याच्या माध्यमातून वाफा पद्धतीने आपण कोथिंबीर लागवड करतो. याशिवाय संपूर्ण कोथिंबीर पिकाचे उत्पादन घेताना, आपण कोणतेही कीटकनाशक किंवा रासायनिक खते वापरत नाहीत. पूर्णपणे जैविक पद्धतीने कोथिंबीर उत्पादन घेतले जाते.”

किती खर्च, किती उत्पन्न?

साधारणपणे आपल्याला एक बिघा क्षेत्रासाठी बियाणे, मजुरी आणि इतर मशागत खर्चासाठी 10 हजार रुपये खर्च येतो. लागवड केल्यानंतर केवळ 30 ते 50 दिवसांमध्ये संपूर्ण बिघाभर रानातील कोथिंबीर काढून होते. ज्यातून आपल्याला चांगला दर मिळाल्यास एका बिघ्यात, दीड महिन्यात एक ते दीड लाखांची कमाई सहज मिळते. परिणामी, आपल्याला दीड महिन्यात कमीत कमी 80 हजार रुपये ते 1 लाख रुपयांचा निव्वळ नफा सहज मिळत असल्याचे सुनील कुमार पाल सांगतात.

आवक नसताना उत्पादनावर भर

उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोथिंबीर उत्पादन घेणे थोडे जिकिरीचे ठरते. वातावरणीय बदलामुळे या कालावधीत बाजारात पुरेशा प्रमाणात कोथिंबीर आवक होत नाही. आपण हीच साधून आपल्या कोथिंबीर उत्पादनातून अधिक दराचा फायदा घेतो. ज्यातून आपल्याला अधिक आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत होते. कारण उन्हाळ्यात आणि पावसाळा ऋतूत कोथिंबीर उत्पादनात सामान्यपेक्षा घट झालेली असते. परिणामी, आपण या कालावधीत निरोगी आणि अधिक उत्पादन मिळवणार भर देतो.

error: Content is protected !!