Success Story : 6 एकरात भाजीपाला पिकांची लागवड; शेतकरी करतोय वार्षिक लाखोंची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी यापूर्वी केवळ पारंपरिक पिकांच्या माध्यमातून शेतीतून (Success Story) उत्पादन घेत होते. मात्र, मागील दोन दशकांमध्ये आधुनिक पद्धतींचा झालेला विकास आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना अल्पावधीत लाखोंचे उत्पादन मिळवणे शक्य होत आहे. महाराष्ट्रातही मागील काही काळामध्ये आधुनिक पद्धतीने फळे, भाजीपाला आणि फुलशेती करण्याची प्रमाण वाढले आहे. आज आपण अशाच एका यशोगाथा पाहणार आहोत. जे आपल्या ६ एकर शेतीमध्ये भाजीपाला पिकांची लागवड करत वार्षिक लाखो रुपयांची कमाई (Success Story) करत आहे.

‘या’ पिकांची करतात लागवड (Success Story Cultivation Of Vegetable Crops)

जसपाल सिंह असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते हरियाणा राज्यातील सिरसा जिल्ह्यातील रहिवासी (Success Story) आहेत. जसपाल हे पूर्वी पारंपारिक पद्धतीने धान आणि गहू या पिकांची लागवड करत होते. मात्र, मिळणारे उत्पन्न हे खूपच कमी असल्याने त्यांनी भाजीपाला शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. जसपाल सध्या आपल्या शेतीमध्ये दुधी भोपळा, डांगर, फ्लॉवर, टोमॅटो, गिलके, दोडका या भाजीपाला पिकांची हंगाम व बाजारभावाच्या अंदाजानुसार शेती करत आहे. तर उन्हाळ्याच्या हंगामामध्ये ते टरबूज लागवड करत आर्थिक नफा मिळवत आहे.

फ्लॉवर पिकाची सर्वाधिक लागवड

शेतकरी जसपाल सिंह सांगतात, आपण शेतीमध्ये सर्वाधिक फ्लॉवरची लागवड (Success Story) करतो. फ्लॉवरच्या शेतीसाठी आपण ‘मैनर’ वाणाची निवड केली असून, त्यातून आपल्याला भावातील चढ-उतार लक्षात घेता प्रति एकरी 1.5 लाख रुपयांची कमाई सहज मिळते. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे वाण उन्हाळ्याच्या हंगामात तीन महिन्यात तर हिवाळ्याच्या हंगामात अडीच महिन्यात तोडणीला येते. फ्लॉवरला 40 रुपये प्रति किलोपर्यंत दर सहज मिळतो. याशिवाय आपल्याला दोडका लागवडीतून प्रति एकरी 2.5 लाख रुपये कमाई मिळते. ज्यास 15 ते 40 रुपये प्रति किलोपर्यंतचा दर मिळतो. याशिवाय आपण अन्य भाजीपाल्याची हंगामानुसार कमी -अधिक प्रमाणात शेती करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आसपासचे शेतकरीही भाजीपालाकडे वळाले

शेतकरी जसपाल सिंह सांगतात, गेल्या दोन दशकांपासून आपण भाजीपाला शेती करत आहे. विशेष म्हणजे आपले भाजीपाला शेतीतून यश पाहून, आजूबाजूचे शेतकरी देखील भाजीपाला शेतीसाठी प्रेरित होऊन उत्पादन घेत आहे. ज्यामुळे सध्याच्या घडीला आपल्या आजूबाजूचा प्रदेश भाजीपाला शेतीच्या उत्पादनाचे केंद्र बनल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे व्यापारी थेट बांधावर येऊन, भाजीपाल्याची खरेदी करत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचे ते सांगतात.

error: Content is protected !!