Success Story : 60 झाडे… वार्षिक 6 लाखांची कमाई; इस्रोतील नोकरी सोडून धरली सेंद्रिय शेतीची वाट!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सेंद्रिय शेतीचे फायदे लक्षात घेऊन, सध्या अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे (Success Story) वळू लागली आहेत. कर्नाटकातील प्राध्यापक दिवाकर चन्नाप्पा हे देखील भारतीय अवकाश संशोधन संस्थेमधील (इस्रो) नोकरी सोडून, आपल्या वडिलोपार्जित शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने (Success Story) खजूर शेती करत आहे. एका एकरात खजुराची त्यांनी 60 झाडे लावली असून, त्याद्वारे वर्षाला खर्च वजा जाता ते एकरी सहा लाखांचा नफा मिळवत आहेत.

कर्नाटकातील सगनहल्ली येथील शेतकरी दिवाकर चन्नाप्पा यांची 7.5 एकर वडिलोपार्जित शेती (Success Story) आहे. या शेतीमध्ये सध्या त्यांनी अडीच एकरांवर खजुराची झाडे लावली आहे. तर सेंद्रिय नाचणी, भात, तूर डाळ, बाजरी, आंबा, पेरू इ. पीकही ते घेत आहेत. सेंद्रिय शेतीसाठी त्यांनी हल्लीकर जातीच्या आठ देशी गायी पाळल्या आहेत. त्यांचे शेण आणि मूत्र याचा वापर करून ते सेंद्रिय खत आणि कीटकनाशके फवारण्या करतात. यासोबतच जीवामृत बनवण्यासाठी गुळाची गरज असल्याने अर्ध्या एकरावर त्यांनी ऊस लागवड केली आहे.

सेंद्रिय पद्धतीने लागवड (Success Story Of Date Palm Farming)

2008 मध्ये इस्रोतील नोकरी सोडल्यानंतर त्यांनी खजूर पिकाच्या लागवडीचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी तामिळनाडूमधील काही शेतकऱ्यांकडून माहिती मिळवली. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी 3,000 रुपये प्रति नग या दराने 150 बारही जातीच्या खजुराची रोपे विकत घेतली. लागवड करताना त्यांनी कडुनिंबाची पेंड, एरंडेल, जीवामृत टाकत सेंद्रिय पद्धतीने या रोपांची लागवड केली. साडेचार लाख रुपयांच्या गुंतवणूक करून, अडीच एकरांवर सध्या त्यांची खजुराची झाडे बहरली आहेत.

किती मिळाले एकरी उत्पादन?

2013 मध्ये त्यांच्या कष्टाला पहिले फळ मिळाले. त्यांनी 70 झाडांच्या माध्यमातून पहिली तोडणी केली. यात त्यांना 650 किलो खजूर मिळाले. ज्यास त्यांना ३७५ रुपये प्रति किलो दर मिळाला होता. तेव्हापासून त्यांना सेंद्रिय खजुराच्या शेतीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळाल्याचे ते सांगतात. यावर्षीच्या हंगामाबाबत बोलताना ते सांगतात, या हंगामात दीड एकरात 102 खजूर झाडांच्या खजुराची काढणी केली असून, त्यातून प्रति झाड 45 ते 50 किलोप्रमाणे 4,200 किलो (4.2 टन) खजुराचे उत्पादन मिळाले आहे. हे खजूर बाजारात 350 रुपये प्रति किलो दराने विक्री केल्याचे ते सांगतात. तर अन्य एका एकरात त्यांची 60 झाडे असून, प्रति झाड 45 किलो प्रमाणे त्यांना 2700 किलो खजूर मिळाले आहे. ही खजूर त्यांनी 300 रुपये किलो दराने विक्री केली आहे. अर्थात (300 X 2700 किलो) एका एकरातून त्यांना 8,10,000 रुपयांचे उत्पन्न मिळाले. यातून मजूर आणि अन्य खर्च वजा जाता आपल्या ६ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे ते सांगतात.

कशी मिळाली प्रेरणा?

इस्रोमध्ये कार्यरत असतानाच जपानी तत्वज्ञानी आणि नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते मासानोबू फुकुओका यांचे ‘वन स्ट्रॉ रिव्होल्यूशन’.हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडत 2008 मध्ये सेंद्रिय शेती करण्याचा निर्धार केला. त्यांचा निर्णयाला घरातील सदस्यांकडून खूप विरोध झाला. मात्र दिवाकर आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी खजूर शेतीबाबत माहिती मिळवणे सुरु केले. खजुराचे झाड हे 100 ते 150 वर्षे फळे देऊ शकते तर 10 वर्षांनंतर 1 एकरामध्ये कमीतकमी 10 लाखाचे उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे त्यांचे कष्टाचे चीज झाल्याचे ते सांगतात.

error: Content is protected !!