Success Story : ड्रॅगन लागवडीतून शेतकऱ्याने साधली प्रगती; वार्षिक 3 ते 4 लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सध्या शेतकरी पिकांमध्ये विविधता (Success Story) आणत आहे. स्थानिक फळे व भाजीपाला पिकांसह सध्या अनेक शेतकरी विदेशी फळपिकांची शेती करत आहे. या पिकांना बाजारभाव अधिक मिळत असल्याने, शेतकऱ्यांना अधिकची कमाई देखील होत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्याने आपल्या शेतीमध्ये विदेशी ड्रॅगन फ्रुट फळाची लागवड केली आहे. इतकेच नाही तर या शेतकऱ्याची विदेशी फळाची शेती पाहून गावातील शेतकरी देखील या फळाची लागवड (Success Story) करत आपली प्रगती साधत आहे.

एकरात 300 रोपांची लागवड (Success Story Of Dragon Fruit Farming)

ऋषि शुक्ला असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तरप्रदेशातील हमीरपुर जिल्ह्याचे रहिवासी आहे. २०१९ साली ऋषी यांनी आपल्या शेतीमध्ये १०० रोपांच्या साहाय्याने ड्रॅगन फळाची (Success Story) शेती करण्यास सुरुवात केली. मात्र, तापमान अधिक असल्याने, त्यांना ड्रॅगन लागवडीतून अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपल्या शेतीमध्ये सध्या ३०० रोपांची लागवड केली आहे. त्यातून त्यांना नियमित फळ मिळण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या पाच वर्षांपासून एक एकरात ते ड्रॅगन फळाची शेती करत आहे.

किती मिळतंय उत्पन्न?

शेतकरी ऋषि शुक्ला सांगतात, पाटनपुर गावात आपली वडिलोपार्जित जमीन असून, त्यातील २ एकर जमिनीत आपण ड्रॅगनची लागवड केली आहे. आपल्या ड्रॅगन फळाची शेती पाहून, सध्या गहू धानाची शेती करणारे शेतकरी देखील ड्रॅगन फळाच्या शेतीकडे आपला कल वळवत आहे. आपल्याला सध्या ड्रॅगन फळाला 400 रुपये किलोचा दर मिळत आहे. ज्यातून आपल्याला मागील पाच वर्षांपासून वार्षिक ३ ते ४ लाखांचा निव्वळ नफा होत आहे. पारंपरिक पिकांपेक्षा एकरात मिळणारे उत्पन्न निश्चितच अधिक आहे. असेही ऋषि शुक्ला सांगतात.

10 पट अधिक उत्पादन

शेतकरी ऋषि शुक्ला सांगतात, आपण पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावर पेरू आणि आंब्याच्या झाडांमध्ये ड्रॅगन फळांची लागवड केली. ज्यातून आपल्याला पहिल्या वर्षी अडीच लाखांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर आपण एक एकर जमिनीमध्ये ड्रॅगन फळाची लागवड केली असून, त्यातून आपल्याला खर्च वजा जाता ३ ते ४ लाख रुपये सहज मिळत आहेत. एकरात गहू पीक घ्यायचे ठरले तर त्यातून केवळ ३० हजार रुपये उत्पन्न मिळते. त्याऐवजी फळ शेती केल्यास त्यातून १० पट अधिक उत्पादन मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकाधिक फळ शेतीचा मार्ग निवडला पाहिजे. असे आवाहनही शेवटी त्यांनी केले आहे.

error: Content is protected !!