Success Story : अडीच एकरात शेवगा लागवड; शेतकरी मिळवतोय वर्षाला 6 लाखांचा नफा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या डिजिटल साधनांच्या (Success Story) मदतीने शेतकऱ्यांना शेती करणे खूपच सोपे झाले आहे. मोबाईल आणि इंटरनेटमुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक माहितीचे आदानप्रदान होऊन, शेती करण्याच्या पद्धतींमध्ये सुधारणा करण्यास मदत झाली आहे. शेतकरी सध्या युट्युब आणि अन्य माध्यमातून शेतीचे नवनवीन ज्ञानार्जन करत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याच्या यशस्वी शेवगा शेतीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी युट्युबच्या माध्यमातून शेवगा शेतीची माहिती मिळवली. विशेष म्हणजे हा शेतकरी याच माहितीच्या जोरावर शेवगा शेतीतून वार्षिक सहा लाखांचा नफा (Success Story) मिळवत आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्याकडून माहिती (Drumstick Farming Success Story)

अनिल वर्मा असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील रहिवासी आहे. मागील तीन वर्षांपासून ते शेवगा शेती करत असून, त्यांनी सध्या आपल्या अडीच एकर जमिनीत शेवगा लागवड (Success Story) केली आहे. शेतकरी अनिल वर्मा हे कोरोना काळात युट्युबच्या माध्यमातून महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याच्या संपर्कात आले होते. या शेतकऱ्याच्या मदतीने त्यांनी शेवगा बियाणे आणि शेवगा शेतीबद्दल अधिक माहिती समजून घेतल्याचे ते सांगतात. याशिवाय अन्य मार्गाने देखील त्यांनी शेवगा शेतीबद्दल इतम्भूत माहिती समजून घेतल्याचे ते सांगतात.

अडीच एकरात 1200 झाडे

अनिल वर्मा सांगतात, “आपण आपल्या दीड एकर जमिनीत शेवग्याची लागवड केली आहे. यासाठी सरकारच्या मनरेगा योजनेचा फायदा घेतला. त्यात आपण अडीच एकरात 1200 झाडे लावली आहे. ही झाडे लावण्यासाठी आपल्याला 1 लाख 10 हजार 704 रुपये मजुरी, अन्य सामग्रीसाठी 21,600 रुपये सरकारी मदत मिळाली. ज्यामुळे आपल्याला उत्पादन खर्चात कपात करण्यास मदत झाली.” इतकेच नाही तर आपण शेवगा पिकासाठी संपूर्ण पिकासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. ज्यामुळे आपल्याला भर उन्हाळ्यात झाडांना योग्य त्या प्रमाणात पाणी देण्यास मदत होते. असेही त्यांनी म्हटले आहे.

किती मिळतंय उत्पन्न?

अनिल वर्मा सांगतात, “आपल्या अडीच एकरात उत्पादित होणाऱ्या शेवग्याच्या शेंगा आपण खरगोन या जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवतो. तसेच बाजारभावानुसार आसपासच्या बाजार समित्यांमध्ये देखील पाठवतो. त्यातून आपल्याला अडीच एकरात वर्षाला सहा लाखांचा नफा मिळवत आहे.” याशिवाय अनिल यांनी अलीकडेच शेवग्याच्या पानांपासून आयुर्वेदिक पावडर बनवणे देखील सुरु केले आहे. ते शेवग्याच्या पानांची पावडर गहू पिठात योग्य त्या प्रमाणात मिश्रित करून, विक्री करत आहे. ही पावडर हाडांचे दुखणे असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय असल्याचे ते सांगतात. या पावडरच्या माध्यमातून देखील त्यांना अतिरिक्त कमाई होत आहे.

error: Content is protected !!