हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही वर्षांमध्ये राज्यासह देशातील शेती करण्याच्या पद्धतींमध्ये (Success Story) पूर्णतः बदल पाहायला मिळत आहे. शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करण्याऐवजी आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर भर देत आहे. त्यातही अनेक शेतकऱ्यांचा जोर हा फळबाग पिकांच्या लागवडीकडे अधिक असतो. आज आपण अशाच एका लिंबू उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार (Success Story) आहोत. ज्यांनी आपल्या ६ एकरात लिंबू लागवड केली असून, त्यातून ते वार्षिक 6 लाखांची कमाई करत आहे.
‘लेमन किंग’ म्हणून ओळख (Success Story Earn 12 Lakhs Own Pickle Brand)
अभिषेक जैन असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अभिषेक यांची वडिलोपार्जित 30 बिघे जमीन असून, 2007 पासून ते शेती करत आहे. त्यांनी आपल्या एकूण जमिनीपैकी 4 एकर जमिनीत लिंबू लागवड (Success Story) केली आहे. त्यांनी जैविक पद्धतीने लिंबू लागवड केली आहे. तसेच त्यांनी आपल्या दीड एकर शेतीमध्ये पेरूची बाग देखील लावली आहे. अभिषेक यांनी कॉमर्स विषयात पदवी संपादन केली असून, वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना शेतीमध्ये यावे लागले. सुरुवातीच्या काळात त्यांना शेतीमध्ये अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, मागील 15 ते 17 वर्षांमध्ये शेतीमध्ये ‘लेमन किंग’ म्हणून ओळख निर्माण केली आहे.
किती मिळतंय उत्पन्न?
अभिषेक जैन यांनी आपल्या शेतीमध्ये बारहमासी प्रजातीच्या लिंबूची लागवड (Success Story) केली आहे. याशिवाय त्यांनी आपल्या काही जमिनीत देशी प्रजातीच्या लिंबाची लागवड देखील केली आहे. या बारहमासी प्रजातीच्या लिंबाची साल पातळ असते. तसेच यामध्ये अधिक प्रमाणात रस आढळून येतो. त्यांनी आपल्या चार एकर जमिनीत लिंबू तर दीड एकरात पेरू लागवड केली असून, त्यासाठी ते संपूर्णतः जैविक खतांचा वापर करत आहे. ज्यामुळे त्यांच्या उत्पादन खर्चात घट होण्यास मदत झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांना आपल्या ६ एकरातील फळबाग शेतीद्वारे वार्षिक 12 लाखांची कमाई होत आहे. याशिवाय त्यांनी आपल्या एक लोणचे ब्रँड निर्माण केला असून, त्यातूनही त्यांना अतिरिक्त कमाई होत आहे.
‘पिकल जंक्शन’ नावाने उभारला ब्रँड
शेतकरी अभिषेक जैन हे लिंबूची शेती करण्यासोबतच लिंबू लोणचे व्यवसायात देखील उतरले आहेत. त्यांनी आपला स्वतःचा ‘पिकल जंक्शन’ नावाचा ब्रँड निर्माण केला असून, त्याद्वारे ते लिंबावर प्रक्रिया करून अतिरिक्त नफा मिळवत आहे. अभिषेक आपल्या शेतीमध्ये उत्पादित एकूण लिंबू उत्पादनापैकी जवळपास 20 टक्के उत्पादनाचा उपयोग हा लोणचे उद्योगासाठी करतात. तर उर्वरित 80 टक्के लिंबू ते घाऊक बाजारात विक्री करतात. आपल्याकडे तयार लोणचे ब्रँडचे त्यांनी सोशल माध्यमांवर मार्केटिंग केले असून, ते अमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या सोशल माध्यमांवर आपले उत्पादन विक्री करत आहे.