Success Story : विदेशातील नोकरी सोडली; गावी शेतीतून करतोय वार्षिक 40 लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केळी या पिकाची लागवड (Success Story) केली जाते. जळगाव जिल्हा केळी उत्पादनात देशात विशेष प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकरी केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना त्यातून मोठा आर्थिक फायदा देखील होत आहे. अशातच आता देशपातळीवर देखील केळी लागवडीखालील क्षेत्र विस्तारताना दिसत आहे. आज आपण अशाच एका केळी उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. जे विदेशातील नोकरी सोडत, आपल्या गावी, आपल्या मातीत केळी पिकातून वार्षिक 50 लाखांची कमाई (Success Story) करत आहे.

गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली (Success Story Earn 40 lakhs From Aagriculture)

अरविंद प्रताप असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तरप्रदेशातील संतकबीर नगर जिल्ह्याचे रहिवासी आहेत. अरविंद यांनी इंजिनिअरिंग पर्यंतचे शिक्षण (Success Story) घेतले असून, त्यांनी काही काळ लंडन या ठिकाणी २ वर्ष गलेलठ्ठ पगाराची नोकरी केली. मात्र विदेशातील नोकरीत मन रमत नसल्याने, त्यांनी 2017 साली आपल्या धनघटा तालुक्यातील मलौली गावची वाट धरली. आज ते आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीमध्ये करत, आधुनिक पद्धतीने केळी पिकाचे उत्पादन घेत आहेत.

वडिलांकडून शेतीची प्रेरणा

शेतकरी अरविंद प्रताप सांगतात, आपल्याला लहानपणापासूनच शेतीसोबत लगाव होता. विशेष म्हणजे मला शेती करण्याची प्रेरणा माझ्या वडिलांपासून मिळाली आहे. माझे वडील 2013 पासून 3 एकर शेतीमध्ये केळीचे उत्पादन (Success Story) घेत आहेत. त्यानंतर आपण सध्या यात हळूहळू वाढ करत, 10 एकरात केळी पिकाचे उत्पादन घेत आहे. याशिवाय वडील केळी सोबतच टोमॅटो, कोबी, वांगी, वाटाणा यांसारख्या भाजीपाला पिकांची देखील लागवड करत होते. आपण ही परंपरा कायम ठेवली असून, केळी पिकासोबतच भाजीपाला पिकांचे देखील उत्पादन घेत आहोत.

किती मिळतंय उत्पन्न?

याशिवाय शेतीमध्ये आपण सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवला आहे. ज्यामुळे आपल्याला कमी कालावधीत अधिक उत्पादन मिळवण्यास मदत होत आहे. इतकेच नाही तर सध्याच्या घडीला आपण विदेशी प्रजातीच्या टरबूज, खरबूज पिकांचे देखील उन्हाळ्यात उत्पादन घेतो. परिणामी, आपल्याला केळी, भाजीपाला पिके, याशिवाय उन्हाळी पिके या माध्यमातून वार्षिक एकत्रिपणे 40 ते 50 लाख रुपयांची कमाई सहज होत असल्याचे ते सांगतात.

थेट बांधावर विक्री

शेतकरी अरविंद प्रताप सांगतात, आपल्याला आपल्या पिकांच्या विक्रीसाठी कुठेही जाण्याची गरज पडत नाही. कारण गुणवत्तापूर्ण शेतमालाच्या उत्पादनामुळे सर्व पिकांसाठी व्यापारी थेट बांधावर येऊन शेतमाल खरेदी करतात. विशेष म्हणजे आपल्याकडे पश्चिम बंगालमधून देखील व्यापारी येत असल्याचे ते सांगतात. ज्यामुळे सध्या अरविंद प्रताप यांची शेतीतील किमया पाहून आजूबाजूचे शेतकरी देखील त्यांचा आदर्श घेऊन, अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकांकडे वळत आहेत.

error: Content is protected !!