Success Story : 50 हजाराची नोकरी सोडली; सफरचंद शेतीतून करतायेत 50 लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला अनेक सुशिक्षित आणि पगारदार व्यक्तींना देखील शेती क्षेत्र (Success Story) खुणावत आहे. परिणामी आज अनेक जण नोकरी सोडून शेतीमध्ये आपले नशीब आजमावताना दिसत आहे. महाराष्ट्रासारख्या आघाडीवरील राज्यात तर फळबाग शेतीतून अनेक शेतकरी मोठी कमाई करत असल्याचे समोर येत आहे. अशातच आता हरियाणातील कर्नाल जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आपली मासिक 50 हजार रुपये पगाराची नोकरी सोडून सफरचंद शेतीची वाट धरली. विशेष म्हणजे या शेतकऱ्याला सफरचंद शेतीतून वार्षिक 50 लाखांचे उत्पन्न मिळत आहे. आज आपण या शेतकऱ्याच्या सफरचंद शेतीची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत.

नरेंद्र सिंह चौहान असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांची स्वतःची वडिलोपार्जित 60 एकर शेती आहे. त्यांनी पदव्युत्तर पदवीपर्यंत आपले शिक्षण पूर्ण केले असून, ते चंदीगड येथे नोकरी करत होते. पगारही उत्तम मिळत होता. वार्षिक 6 लाख रुपये घरात येत होते. मात्र सर्व काही ठीक सुरु असताना नरेंद्र यांना शेतीची आवड निर्माण होऊन, ते आपल्या शेतीमध्ये अधिक लक्ष देऊ लागले. नव्याने शेतीत काहीतरी करण्याचा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.

कोणत्या पिकांची लागवड? (Success Story Earn 50 Lakhs Apple Farming)

अशातच शेतीत रुची वाढू लागल्याने त्यांनी राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत फळ रोपवाटिका (नर्सरी) सुरु करण्यासाठी अर्ज केला. त्यांना सरकारकडून नर्सरी साठीचा परवाना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. आणि पूर्णवेळ शेती मध्ये लक्ष देण्यास सुरवात केली. आज ते आपल्या 14 एकर शेतीत फळ पिकांचे उत्पादन घेत असून, सफरचंद, बदाम, पीच, बटाटा, आंबा या फळांची त्यांनी लागवड केली आहे.

किती मिळतंय उत्पन्न?

नोकरी सोडून शेतीची वाट धरणाऱ्या नरेंद्र यांची फळबाग शेती पाहण्यासाठी आणि त्याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी आज देश-विदेशातून शेतकरी त्यांच्या शेतात भेट देत आहेत. नरेंद्र चौहान हे परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक रोल मॉडेल ठरले आहेत. त्यांना एका खासगी कंपनीतील नोकरीतून वार्षिक केवळ 6 लाख रुपये मिळत होते. मात्र सध्या ते आपल्या 14 एकरावरील फळबाग शेतीतून वार्षिक 50 लाखांचे उत्पन्न मिळवत असलयाचे ते सांगतात. याशिवाय ते आपला नर्सरीचा उद्योग देखील करत आहेत. त्यातूनही त्यांना उत्पन्न मिळत आहे. त्यांच्या शेतात उत्पादित होणारी सफरचंद ते मार्केटला विक्री न करता थेट व्यापारांना बांधावर विक्री करतात.

भाजीपाल्याचीही लागवड

फळ शेतीसोबतच नरेंद्र चव्हाण यांनी आपल्या शेतीमध्ये टोमॅटो, कोबी, अशा फळभाज्यांची देखील लागवड करत आहेत. त्यातूनही त्यांना काही प्रमाणात उत्पन्न मिळत आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक गहू, तांदूळ पिकांऐवजी फळबाग लागवड करावी, असे आवाहन ते नव्याने शेतीत येऊ पाहणाऱ्या तरुणांना करतात. फळबाग शेतीसाठी सरकारच्या अनेक योजना असतात. या योजनांचा लाभ घेऊन फळ पिकांची लागवड करत, शेतकरी अधिकचा नफा कमावू शकतात. असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.

error: Content is protected !!