Success Story : झेंडू लागवडीतून शेतकऱ्याने साधली प्रगती; करतोय लाखोंची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागातील शेतकरी सध्या पारंपारीक शेतीला (Success Story) फाटा देत नगदी पिकांकडे वळत आहे. यामध्ये शेतकरी सध्या भाजीपाला शेती आणि फुलशेतीला सर्वाधिक प्राधान्य देत आहे. फुलांना बाजारात बाराही महिने मागणी राहत असल्याने, शेतकऱ्यांना फुलांच्या शेतीतून मोठा आर्थिक फायदा देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका झेंडू फुलांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी मागील 20 वर्षांपासून झेंडू फुलांच्या लागवडीतून आपली आणि आपल्या कुटुंबाची प्रगती (Success Story) साधली आहे.

20 वर्षांपासून झेंडूची लागवड (Success Story NABARD Loan Earning Lakhs From Marigold Farming)

अंबिका भगत असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते बिहारच्या सारण जिल्ह्याच्या चंचलिया गावचे रहिवासी आहे. शेतकरी अंबिका भगत यांनी म्हटले आहे की, मागील 20 वर्षांपूर्वी आपण प्रायोगिक स्वरूपात झेंडूची लागवड (Success Story) करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून आपण दरवर्षी झेंडूची लागवड करतो. पारंपारिक पिकांच्या तुलनेत आपल्याला झेंडूच्या फुलांपासून अधिक कमाई होते. हीच बाब लक्षात घेऊन सध्या गावातील अनेक शेतकरी सध्या झेंडूच्या फुलांची लागवड करत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना एक ते सव्वा गुंठे जमिनीतच फुलांच्या शेतीतून 10 ते 15 हजार रुपयांची कमाई होत आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

कर्ज उभारण्यात अडचणी

शेतकरी अंबिका भगत यांनी म्हटले आहे की, काही झेंडूच्या फुलांसोबतच गुलाब आणि रजनीगंधा फुलांची शेती करत आहे. फुलांच्या शेतीसाठी आपण कर्ज उभारण्यासाठी नाबार्डकडे अर्ज केला. मात्र, आपल्याला फुलशेतीसाठी सरकारी कर्ज मिळाले नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना फुलशेतीसाठी कर्ज उभारण्यात अडचणी आल्या. मात्र, शेतकऱ्यांना स्वतःच्या भांडवलावर कर्ज उभारून फुलांची शेती करणे सुरु केले आहे. ज्यामुळे त्यांना उत्पादन खर्चात वाढ झाली. मात्र, सध्या शेतकरी फुल शेतीतून समाधानी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

किती मिळतंय उत्पन्न?

शेतकरी अंबिका भगत यांनी म्हटले आहे की, झेंडूच्या फुलांची शेती करताना आपण पश्चिम बंगालहून रोपे मागवतो. ज्यामुळे रोपांच्या खर्चात वाढ होते. मात्र, मेहनत घेऊन फुलांच्या शेतीतून अधिक उत्पन्न मिळत असल्याने केलेला खर्च फारसा वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय आपण रजनीगंधा आणि गुलाब फुलांची शेती करत आहोत. झेंडूच्या फुलांमधून आपल्याला प्रति एक कट्टा जमिनीतून (एक किंवा सव्वा गुंठा जमीन) 10 ते 15 हजारांची कमाई होते. तर आपल्याला झेंडूच्या फुलांच्या शेतीसाठी प्रति सव्वा गुंठा जमिनीसाठी तीन हजार रुपये खर्च येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!