हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड (Success Story) केली जाते. तुरीच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळून, त्याद्वारे चांगला नफा देखील मिळत आहे. आज आपण उत्तरप्रदेशातील अशाच एका तूर उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने तूर शेती करण्यासाठी 2005 मध्ये आपला पोलीस शिपाई (Success Story) पदाचा राजीनामा दिला आहे.
नोकरीत मन रमेना (Success Story Of Tur Farming)
उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यातील अविनाश कुमार असे या शेतकऱ्याचे नाव आहे. 1998 मध्ये अविनाश उत्तरप्रदेश पोलीस दलात भरती झाले होते. मात्र, शेती करण्याची आवड असल्याने नोकरीत त्यांचे मन रमत नव्हते. त्यामुळे 2005 साली त्यांनी आपल्या पोलीस दलातील पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून शेतकरी अविनाश हे तुरीची शेती करत असून, यावर्षी त्यांनी जवळपास 11 एकर शेतीमध्ये तुरीची लागवड केली आहे. त्यांना तुरीच्या उत्पादनातून एकरी 27 ते 30 हजार रुपयांचा निव्वळ नफा होत आहे. अर्थात 11 एकरातील एकूण तुरीमधून त्यांना वार्षिक 3 ते 3.5 लाख रुपयांची कमाई होत असल्याचे ते सांगतात. या तुरीची त्यांनी सेंद्रिय पद्धतीने लागवड केली असून, त्यांना उत्पादन खर्च वगळता काहीही विशेष कष्ट न घेता ही कमाई मिळत असल्याचे अविनाश यांनी सांगितले आहे.
कमी कालावधीत तूर काढणी
शेतकरी अविनाश हे तुरीसोबतच औषधी वनस्पतींचीही शेती (Success Story) करत आहेत. ते शेतीमध्ये विविध पिकांवर संशोधन करत असतात. याच प्रयोगातून ते तुरीच्या प्रामुख्याने दोन प्रजातींची शेती करत आहेत. यातील एक प्रजाती ही 120 से 140 दिवसांमध्ये काढणीला येते. या प्रजातीची लागवड त्यांनी जुलै महिन्यामध्ये केली असून, त्यांची तुरीची सध्या काढणी झाली आहे. त्यांची ही तूर सर्वसाधारणपणे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढणीला येते. त्यामुळे या जातीची लागवड केल्यास कमी कालावधीत त्यांना तुरीचे उत्पादन मिळते. या प्रजातीचे बियाणे त्यांनी मध्य प्रदेशातील आदिवासी भागातून उपलब्ध केले आहे. तर दुसऱ्या प्रजातीची लागवड त्यांनी आपल्या सर्व शेतीच्या बांधावर केली आहे. या प्रजातीला तुलनेने अधिक कालावधी लागतो.
25 कृषी विद्यापीठांना भेट
अविनाश सांगतात, तुरीच्या दोन्ही जातींची सेंद्रिय पद्धतीने लागवड केल्यास नफा जास्त मिळतो. शेतीची आवड असल्याने अविनाश यांनी आतापर्यंत देशातील 25 कृषी विद्यापीठांना भेट दिली आहे. याशिवाय आतापर्यंत देशातील 80 कृषी विज्ञान केंद्रांमध्ये जाऊन शेतीतील विविध पिकांबाबत माहिती मिळवली आहे. शेतीच्या नवनवीन तंत्रांचा अभ्यास करण्याचा त्यांचा मानस असतो. त्यांच्या याच आवडीतून त्यांनी ज्वारी, बाजरी, उडीद, कापूस या पिकांसह तुरीच्या लागवडीतूनही चांगला नफा मिळवला जाऊ शकतो, हे दाखवून दिले आहे.