Success Story : 2 वर्षांपूर्वी रोटाव्हेटर फिरवला; यंदा त्याच आले पिकातून बिघ्यात सहा लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती करताना शेतकऱ्यांना अपयश हे नवीन नाही. काबाडकष्ट करूनही शेतकऱ्यांना शेतीतून निश्चित उत्पन्न (Success Story) मिळेल की नाही? याची शाश्वती नसते. नैसर्गिक आपत्तीचा सामना, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे होणारा आर्थिक फटका हा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. ज्यामुळे कधी एखाद्या पिकाला बाजारभाव नाही मिळाला तर संपूर्ण पिकाचा खर्च शेतकऱ्यांच्या अंगावर पडतो. तर कधी शेतकऱ्यांना एखाद्या पिकातून अधिकचा नफा देखील मिळतो. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत. ज्यांनी दोन वर्षांपूर्वी योग्य भाव मिळत नसल्याने, आपल्या आले पिकावर रोटाव्हेटर फिरवला होता. मात्र, यंदाच्या वर्षी त्यांना याच आले पिकातून जवळपास सहा लाखांची कमाई झाली आहे.

अपयशावर केली मात (Success Story of Ginger Farming)

विष्णू पाचे असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी गावचे रहिवासी आहेत. शेतकरी विष्णू पाचे हे गेल्या तीन वर्षांपासून आले शेती (Success Story) करत आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपूर्वी आले पिकाला योग्य दर मिळाला नसल्याने, त्यांना आले पीक काढणीला देखील परवड नव्हते. ज्यामुळे त्यांनी त्यावेळी केलेला उत्पादन खर्च अंगावर घेतला. आणि भाव मिळत नसल्याने त्यावर रोटाव्हेटर फिरवण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. मात्र, याही परिस्थितित अपयशाने खचून न जाता शेतकरी विष्णू पाचे यांनी आले पिकाचे उत्पादन घेणे सुरूच ठेवले.

70 क्विंटलपर्यंत उत्पादनाची अपेक्षा

शेतीत परिस्थिती नेहमी सारखी नसते. असे म्हणत शेतकरी नेहमीच अपयशातून पुढे जात असतात. ते जिद्दीने आपल्या पिकांच्या लागवड करणे सोडत नाही. याच मार्गाने जात शेतकरी विष्णू पाचे यांनी देखील आले पिकाचे उत्पादन घेणे चालूच ठेवले. त्यांनी यंदा आपल्या एक बिघ्यात आले लागवड केली होती. त्यांचे आले पीक सध्या काढणीला आले असून, त्यांना एका बिघ्यात विक्रमी 70 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळण्याची अपेक्षा असल्याचे ते सांगतात.

किती उत्पन्न मिळणार?

शेतकरी विष्णू पाचे सांगतात, यंदा लागवडीपासून आपण आले पिकाकडे विशेष लक्ष दिले. ज्यामुळे यंदा आपल्याला बिघ्यात ७० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. सध्याचा आले काढणी सुरु असून, बाजारात आल्याला ८५०० ते ९००० हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळत आहे. ज्याद्वारे आपल्याला एका बिघ्यात एकूण ७० क्विंटल आले उत्पादनाच्या माध्यमातून एकूण सहा लाखांचे उत्पन्न मिळणार असल्याचे ते सांगतात.

error: Content is protected !!