Success Story : पतीचे आजारपण, मुलांचे शिक्षण; न खचता महिलेची दीड बिघ्यात 2 लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडे राज्यासह देशात अल्पभूधारक शेतकऱ्यांची (Success Story) संख्या वाढत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना तोकड्या जमिनीत पिकाला योग्य भाव न मिळाल्यास उत्पादन खर्च मिळणेही मुश्किल झाले आहे. परिणामी सध्या अनेक शेतकरी एकात्मिक शेतीकडे वळत आहे. यामध्ये महिला देखील मागे नसून, आपल्या कष्टाच्या जोरावर, त्या कमी जमिनीत अधिक उत्पन्न मिळवताना दिसत आहे. आज आपण अशाच एका महिला शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्या आपल्या दीड बिघा जमिनीमध्ये पेरू लागवड करण्यासह भाजीपाल्यांचे आंतरपीक घेऊन, दोन लाखांची कमाई (Success Story) करत आहेत.

पेरू बागेसह आंतरपिकांची लागवड (Success Story Earns 2 Lakhs Guava Farming)

सावित्री तिवारी असे या महिला शेतकऱ्याचे नाव (Success Story) असून, त्या उत्तरप्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यांनी आपल्या पाऊण एकर अर्थात दीड बिघा जमिनीत जैविक पद्धतीने 350 पेरूचे झाड लावले आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या पेरूच्या बागेमध्ये कडधान्य पिके, वाटाणा, वांगी यासह अन्य भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. अर्थात पेरूच्या लागवडीसह त्या बाजाराच्या अंदाजानुसार आपल्या शेतात विविध भाजीपाल्याची लागवड करतात.

किती मिळतंय उत्पन्न?

शेतकरी सावित्री तिवारी सांगतात, पती रिक्षा चालवत होते. तर आपण शेतीसह शिलाई मशीनवर काम करत होते. मात्र, पती सातत्याने आजारपणात असल्याने आपल्याला शेतीत अधिक लक्ष द्यावे लागले. सुरवातीला ज्वारी, गहू यांसारख्या पारंपारिक पिकांतून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. मुलांचे शिक्षण केवळ शिलाई मशीनवर आणि पारंपारिक पिकांवर चालणे शक्य नव्हते. ज्यामुळे आपण नैसर्गिक वळण्याचा निर्णय घेतला. मागील चार वर्षांपासून आपण पेरू बागेची जोपासना करत आहे. ज्यातून पहिले वर्ष फळ मिळाले नाही. मात्र, त्यांना आता पेरू बागेसह आंतरपिकांमधून दरवर्षी दीड बिघ्यात २ लाख रुपयांची निव्वळ नफा होत असल्याचे त्या सांगतात.

शेतकऱ्यांसाठी बनल्यात प्रेरणास्रोत

सध्याच्या घडीला कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले अनेक शेतकरी आत्महत्या करतात. मात्र, 43 वर्षीय महिला शेतकरी सावित्री तिवारी या पतीच्या आजारपणातही जराही खचल्या नाही. त्यांनी शेतीमध्ये जोमाने झोकून देत उत्पन्न मिळवण्यास (Success Story) सुरुवात केली. त्या आपल्या पतीच्या दवाखान्याचा खर्च आणि मुलांचा शिक्षणाचा खर्च समर्थपणे पेलत आहे. त्यामुळे सध्या त्या अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहे. त्या आपल्या दीड बिघा जमिनीत 350 पेरूच्या झाडांसह भाजीपाला पिकांमधुन वार्षिक खर्च वजा जाता दोन लाखांची कमाई करत आहेत.

error: Content is protected !!