Success Story : आवड म्हणून शेती केली; देश-विदेशातून लोक घेतायेत त्यांच्याकडे प्रशिक्षण!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक शेतकरी पारंपरिक पिकांना (Success Story) मूठमाती देत, भाजीपाला पिकांची लागवड करत आहे. त्यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफाही मिळत आहे. मात्र तुम्ही कधी घराच्या छतावर विविध प्रकारचा भाजीपाला व फुलांची लागवड करून लाखोंचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याबद्दल (Success Story) ऐकलंय का? नाही ना? तुम्ही म्हणाल घराच्या छतावर भाजीपाला लागवड करून इतके उत्पादन मिळते कसे? चला तर मग जाणून घेऊया. अशाच एका घराच्या छतावर भाजीपाला व फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या यशाबद्दल…

विविध फळांची लागवड (Success Story Of Vertical Farming)

हरियाणामधील करनाल जिल्ह्यातील शेतकरी रामविलास आपल्या घराच्या छतावर मागणीनुसार विविध प्रकारची भाजीपाला पिके घेत आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजीपाला, फुले, ड्रॅगन फ्रुट, पेरू, टोमॅटो आणि बोर आदींची लागवड त्यांनी केली आहे. त्यांच्या या शेतीची चर्चा भारतातच नव्हे तर विदेशांमध्ये देखील होत आहे. देशविदेशातील लोक त्यांचा व्हर्टिकल फार्मिंगबाबत माहिती घेण्यासाठी येत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याकडे स्वतःची कोणतीही जमीन नाही.

‘मिनी शेती’चे स्वरूप

तुमच्यामध्ये मेहनत करण्याची क्षमता आणि आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता. हेच रामविलास यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या शेतीची चर्चा देशातच नव्हे तर अमेरिकेतूनही त्यांच्याकडे लोक व्हर्टिकल फार्मिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी येत आहेत. रामविलास यांनी आपल्या छतावर ‘मिनी शेती’ अर्थात छोटेखानी शेती उभारली आहे. सुरुवातीला आवड म्हणून भाजीपाला शेती केली. मात्र हळूहळू त्यांनी आपल्या छतावर वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला, फुले, ड्रॅगन फ्रुट, पेरू, आणि बोराची लागवड केली आहे.

स्वतःची शेती नाही

रामविलास यांच्या म्हणण्यानुसार, देशातील केवळ 10 टक्के लोकांकडे जमीनचा मालकी हक्क शिल्लक राहिला आहे. सध्या त्यांच्याकडे शेती नसल्याने ते छतावर भाजीपाला पिकांची लागवड करत आहे. वर्षभर विविध प्रकारचा ताजा भाजीपाला ते उपलब्ध करतात. त्यांनी जागतिक तापमान वाढीसंदर्भात जागरूकता निर्माण केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, छतावर भाजीपाला पिकांची लागवड केल्याने, त्यांना एसी आणि पंखा यासारख्या गोष्टींचा खूप अल्प प्रमाणात वापर करण्याची गरज पडते. छत नेहमी थंड राहत असल्याने ऐन उन्हाळ्यातही घरात थंड हवा खेळती राहते. त्यांच्या याच अविष्काराची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र, गुजरातसह वेगवेगळ्या राज्यांतून प्रशिक्षण घेण्यासाठी लोक त्यांच्याकडे येत आहेत. इतकेच नाही तर अमेरिकेतून लोक त्यांच्या छतावरील शेतीची माहिती घेण्यासाठी येत आहेत.

कोणत्या फळांची केलीय लागवड?

ते सांगतात, येत्या काळात पीक घेण्यासाठी जास्त जमिनीची गरज पडणार नाही. अनेक लोक आपआपल्या छतावर जैविक शेती करताना दिसतील. रामविलास यांनी आपल्या छतावर पेरू, ड्रॅगन फ्रुट, टोमॅटो, बोर, काकडी आणि विविध प्रकारच्या फुलांची लागवड केली आहे. ते म्हणतात छतावर भाजीपाला शेती केल्याने ताज्या भाजीपाल्याच्या माध्यमातून चांगली कमाई होते. रामविलास यांचा हा प्रयत्न शेतकऱ्यांसाठीच नाही तर प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहे. ते सध्या व्हर्टिकल फार्मिंगच्या माध्यमातून लाखोंचे उत्पन्न मिळवत आहे. ज्यामुळे त्यांना मोठा आर्थिक आधार झाला आहे. लग्न समारंभाच्या काळात आपल्याला फुलांच्या लागवडीतून चांगली कमाई होत असल्याचे ते सांगतात. त्यांचा हा प्रयत्न सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरत आहे.

error: Content is protected !!