Success Story : उन्हाळी गिलके लागवड; शेतकऱ्याने कमावला 2 महिन्यात दिड लाखांचा नफा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये भाजीपाला पिकांना (Success Story) मोठी मागणी असते. याउलट याच कालावधीत त्यांची बाजारातील आवक ही खूपच कमी असते. ज्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला पिकांच्या माध्यमातून उन्हाळ्यात मोठी आर्थिक कमाई होते. आज आपण अशाच एका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. जे मागील तीन वर्षांपासून गिलके लागवड करत असून, यंदाच्या उन्हाळ्यात त्यांनी आपल्या दोन बिघे रानात गिलके उत्पादन घेतले आहे. ज्यातून त्यांना खर्च वजा जाता दोन महिन्यात 1 लाख 60 हजारांचा (Success Story) निव्वळ नफा झाला आहे.

दररोज 3 कॅरेट गिलके तोडणीला (Success Story Vegetable Farming)

पंकज गंगवार असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तरप्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील हाजीपुर गावचे रहिवासी (Success Story) आहेत. शेतकरी पंकज गंगवार हे मागील तीन वर्षांपासून गिलके लागवडीकडे वळले असून, त्यांनी यावर्षी एक एकरात गिलके लागवड केली आहे. गिलके लागवड करताना त्यांनी ठिबक सिंचन पद्धत आणि मल्चिंग पेपरचा वापर केला आहे. ज्यामुळे त्यांना कमी पाण्यात उत्पादन घेणे शक्य झाले असून, केवळ महिनाभरात त्यांना गिलके उत्पादन मिळणे सुरु झाले. सध्या त्यांच्या गिलके पिकाची तोडणी सुरु असून, एक कॅरेट 24 किलो याप्रमाणे दररोज 3 कॅरेट गिलके तोडणीला येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

किती मिळाले उत्पन्न?

शेतकरी पंकज गंगवार सांगतात, आपल्याला दोन एकरात गिलके लागवड करण्यासाठी ठिबक, मल्चिंग, मशागत खर्च, मजुरी आणि इतर खर्च पकडून एकूण 40 ते 50 हजारांच्या आसपास खर्च आला आहे. साधारणपणे महिनाभरात गिलके तोडणीला आल्यानंतर आतापर्यंत सरासरी 50 ते 60 रुपये प्रति किलोचा दर गिलक्यास मिळाला आहे. तसेच आतापर्यंतच्या सर्व तोड्यांमधून एकत्रिपणे एक एकरात एकूण 2 लाखांची कमाई झाली आहे. ज्यातून खर्च वजा जाता 1 लाख 60 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे ते सांगतात.

कमी खर्चात अधिक नफा

शेतकरी पंकज गंगवार सांगतात, गिलके या फळभाजी पिकाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यास अगदी छोट्या शहरांपासून सर्वच ठिकाणी मोठी मागणी असते. ज्यामुळे कमी उत्पादन खर्चात गिलके पिकातून अधिक नफा मिळतो. गिलके या फळभाजीत कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह आणि व्हिट्यामिन ए अधिक प्रमाणात असते. याशिवाय खूपच कमी कालावधीत गिलके हे पीक तोडणीला येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांऐवजी नगदी भाजीपाला पिकांच्या लागवडीकडे वळावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी शेतकऱ्यांना केले आहे.

error: Content is protected !!