Success Story : शेतकऱ्याने दुचाकीलाच बनवले ट्रॅक्टर; हायड्रोलिक, रिव्हर्स गिअरसह सर्व यंत्रणा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी सध्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा (Success Story) मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांनी शेतीसाठी लागणारी अनेक आधुनिक अवजारे आणि साधने बाजारात आणली आहे. मात्र या साधनांच्या किमती जास्त असल्याने शेतकरी सध्या आपापल्या पातळीवर जुगाड करून शेती करण्यासाठी लागणारी साधने बनवत शेती काम सोपे करताना दिसत आहे. आता असाच एक देशी जुगाड कापूस उत्पादक शेतकरी प्रवीण मते यांनी केला आहे. मते यांनी आपल्या मोटर सायकलला ट्रॅक्टरची हायड्रोलिक, रिव्हर्स गिअरसह सर्व यंत्रणा बसवली असून, त्याचा वापर करून ते शेतीच्या मशागतीची (Success Story) कामे करत आहेत.

शेतकरी प्रवीण मते (Success Story) हे अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी तालुक्‍याचा हिरापूर गावचे रहिवासी आहे. त्यांनी एका जुन्या दुचाकीच्या माध्यमातून शेतीच्या कामासाठी एक भन्नाट ट्रॅक्टर आधारित दुचाकी बनवली आहे. या दुचाकीच्या सहाय्याने ते आपल्या शेतातील पेरणी, स्लरी पाडणे, कुळवणी, वखरणी, फणणी अशी सर्व कामे ते करत आहेत. याशिवाय औषध फवारणीसाठी त्यांनीं या दुचाकीवर कॉम्प्रेसर देखील बसवला आहे. मते यांची अडीच एकर शेती असून, ते आपल्या शेतात कापूस आणि संत्रा ही पिके घेत आहेत. याशिवाय त्यांनी शेतीला हातभार लागावा या उद्देशाने पोल्ट्री व्यवसायाची देखील उभारणी केली आहे.

कशी सूचना कल्पना? (Success Story Of Two-Wheeler Tractor Farmer)

शेतकरी प्रवीण मते हे अल्पभूधारक शेतकरी असल्याने ते आपल्या शेतीसाठी मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत होते. मात्र त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार होता. त्यामुळे त्यांना शेतीचे काम सोपे करण्यासाठी नवीन काहीतरी जुगाड करण्याची इच्छा शांत बसू देत नव्हती. अशातच त्यांना मोटर सायकलचा वापर करून शेतीचे कामे करता येतील, असा विचार मनात आला. त्यानंतर त्यांनी आपल्या घरच्या मोटर सायकलचे मेकॅनिक मित्राकडून मॉडिफिकेशन करून घेतले. यासाठी त्यांना जवळपास 30 हजार रुपये खर्च आला.

शेतीचे काम झाले सोपे

मात्र ते इथपर्यंतच थांबले त्यांनी पुढे काही काळानंतर पुन्हा त्यांनी आपल्या मोटरसायकल आधुनिक बनवत, दुचाकीला त्यांनी हायड्रोलिक सिस्टीम, रिव्हर्स गिअरसह सर्व यंत्रणा बसवली. हायड्रोलिक सिस्टीमसाठी त्यांनी ग्रीसचा (ऑइल) वापर केलेला आहे. ओलसर जमिनीत पावसाळ्यात शेती काम करताना टायर फसण्याची अडचण येऊ नये. म्हणून जाड टायरची व्यवस्था करत दोन्ही बाजूने त्यांनी ते बसवले आहेत. त्यामुळे आता ओल्या जागेत शेतात दुचाकी फसण्याची समस्याही यामुळे निकाली निघाली आहे, असे शेतकरी प्रवीण मते सांगतात.

प्रवीण मते यांनी आतापर्यत सुजूकी, पल्सर आणि बुलेट अशा तीन गाड्यांवर ही यंत्रणा विकसित केली आहे. यातील एक गाडी 100 सीसी तर अन्य दोन गाड्या या 150 सीसी क्षमतेच्या आहेत. असेही त्यांनी सांगितले आहे. शेतीच्या कामासाठी जास्त ऊर्जेच्या गाड्या लागतात असेही त्यांनी शेवटी नमूद केले. त्यामुळे आपण क्षमतेनुसार तीन गाड्यांची निर्मिती केली आहे. असेही शेतकरी प्रवीण मते यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!