Success Story : लसूण शेतीतून बनला कोट्याधीश; शेतकऱ्याचा व्हिडीओ ऐकून चाट पडाल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील लसूण दर सध्या गगनाला भिडले (Success Story) आहेत. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील काही भागामध्ये बऱ्यापैकी लसूण लागवड केली जाते. तर शेजारील राज्य असलेल्या मध्यप्रदेशात शेतकरी मोठ्या प्रमाणात लसूण लागवड करतात. दरवर्षी शेतकऱ्यांना लसणाचा उत्पादन खर्चही निघत नाही. मात्र, यावर्षी लसूण दर प्रति किलो 400 रुपये पर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे लसूण दराने साथ दिल्याने मध्यप्रदेशातील शेतकरी कोट्याधीश झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज आपण मध्यप्रदेशातील अशाच एका लसूण उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्या शेतकऱ्याला यंदा चांगला भाव मिळाला असल्याने लसूण पिकातून त्याला 1 कोटीहुन अधिक कमाई (Success Story) झाली आहे.

किती आला उत्पादन खर्च (Success Story Farmer Turned Millionaire From Garlic Farming)

राहुल देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव असून, तो मध्यप्रदेशातील छिंदवाड़ा जिल्ह्यातील (Success Story) रहिवासी आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, या शेतकऱ्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सप्टेंबर महिन्यात आपल्या 13 एकर शेतात लसूण लागवड केलेली होती. ज्यासाठी या शेतकऱ्याला जवळपास 25 लाखांचा उत्पादन खर्च आला. मात्र, यंदा लसणाला इतका अधिक भाव मिळेल, असे त्याला कधीच वाटले नव्हते. यावर्षी लसूण दरात अचानक वाढ झाल्याने यंदा आपल्याला पाचपट अधिक कमाई झाली आहे. असे शेतकरी राहुल देशमुख याने एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना म्हटले आहे.

4 एकरात बसवले सीसीटीव्ही

इतकेच नाही तर सध्या या शेतकऱ्याच्या शेतातील लसूण काढणी सुरूच असून, दरवाढीमुळे सध्या लसूण चोरीच्या घटना आपल्याकडे घडत असल्याचे राहुल याने म्हटले आहे. त्यामुळे राहुलने आपल्या लसूण काढणी न झालेल्या 4 एकर शेतासाठी सोलर आधारित सीसीटीव्ही देखील बसवले आहेत. ज्यासाठी त्याला 8 हजार रुपयांचा खर्च आल्याचे तो सांगतो. दरवर्षी आपल्याला लसूण लागवडीचा उत्पादन खर्चही निघत नव्हता. मात्र यावर्षी आपल्याला आतापर्यंत 9 एकरातून 1 कोटीहून अधिक कमाई झाल्याचे शेतकरी राहुल देशमुख सांगतो.

लसूण दरात अभूतपूर्व वाढ

दरवर्षीच्या हंगामामध्ये लसूण दर सर्वसाधारणपणे बाजार समित्यांमध्ये जास्तीत जास्त 80 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचतात. मात्र, यावर्षीच्या हंगामात लसूण दर 300 ते 400 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले आहेत. अशातच शेतात आपले लसूण पीक उभे असून, या दरवाढीमुळे आपल्याला मोठा फायदा झाला आहे. दरम्यान, आतापार्यंत गेल्या काही वर्षांमध्ये लसूण दर हे इतके कधी वाढले नसल्याचे छिंदवाडा येथील शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. वृत्तसंस्थेने छिंदवाड़ा जिल्ह्यातील आणखी एका शेतकऱ्यासोबत बातचीत केली. बदनूर येथील या शेतकऱ्याचे नाव पवन चौधरी असे असून, या शेतकऱ्याने देखील आपल्या 4 एकर जमिनीत लसूण लागवड केलेली होती. ज्यास लागवडीसाठी 4 लाख रुपये खर्च आला. तर लसूण पिकातून आपल्याला 6 लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळाल्याचे या शेतकऱ्याने म्हटले आहे.

error: Content is protected !!