Success Story : जरबेरा फुलशेतीतून पुण्यातील महिला शेतकऱ्याची दररोज हजारोंची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज देशातील असे एकही क्षेत्र नाहीये ज्यात महिलांनी आपला ठसा उमटवलेला (Success Story) नाहीये. प्रत्येक क्षेत्रात महिला आपले अस्तित्व यशस्वीपणे सिद्ध करीत आहेत. त्यात शेती क्षेत्र देखील मागे नाही. शेतीमध्ये तर महिला सुरवातीपासूनच पुरुषांच्या बरोबरीने राबताना आपण पाहत आलो आहे. मात्र सध्या काही महिला या शेतीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतमालाचे उत्पादन वाढवून यशस्वीपणे शेती करीत आहेत. आज आपण पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील अशाच एका आधुनिक पद्धतीने पॉलीहाऊसमध्ये जरबेरा फुलाची शेती करणाऱ्या महिला शेतकऱ्याची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत.

भोर तालुक्यातील बालवडी येथील स्वाती किंद्रे असे या शेतकरी महिलेचे (Success Story) नाव आहे. स्वाती या उच्चशिक्षित असून, त्या आपल्या शेतीमध्ये पारंपरिक पिके घेत होत्या. मात्र त्या पिकांतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी फुलशेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. फुलशेती करताना त्यांनी जरबेरा फुलशेतीची निवड केली. यासाठी स्वाती यांना त्यांचे पती अमित ज्ञानेश्वर किंद्रे यांचे खूप सहकार्य मिळाले. अमित हे पुणे जिल्हा सहकारी बँकेत कार्यरत आहे. त्यामुळे स्वाती कुटुंबाची जबाबदारी सांभाळून यशस्वीपणे आत्मविश्वासाने शेती क्षेत्रात गगनभरारी घेत आहे.

कशी केली लागवड? (Success Story Of Gerbera Flower Farming)

स्वाती केंद्रे यांनी 30 गुंठे जमिनीत जरबेरा फुलशेतीसाठी पॉलिहाऊस उभारले आहे. जरबेरा लागवडीपूर्वी त्यांनी लाल माती, भाताची तूस आणि 25 ट्रॉली शेणखत जमिनीमध्ये चांगले मिक्स करून घेतले. यासाठी त्यांनी ट्रॅक्टरने नांगरणी करत, रोटाव्हेटरने सर्व खत जमिनीत मिक्स केले. जरबेरा लागवडीसाठी त्यांनी राईस आणि शाईन जरबेरा या जातीची 18 हजार रोपे उपलब्ध केली. ही रोपे त्यांनी बेड पद्धतीने ठिबकचा वापर करत लावली. त्यांचा जरबेरा हा प्लॉटमध्ये हा उत्तमरित्या फुलला असून, त्यातून त्यांना सध्या लाखोचे उत्पन्न मिळत आहे.

किती मिळतोय भाव?

सध्या लग्नसराई आणि उत्सवांचा काळ सुरु असल्याने बाजारात फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जरबेरा हे पीक वर्षभर येत असल्याने आर्थिक उत्पन्नाचे चांगले माध्यम आहे, असे स्वाती किंद्रे सांगतात. त्या आपल्या शेतात उत्पादित होणारी सर्व फुले पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केटमध्ये पाठवतात. त्यासाठी त्यांना 20 रुपये ते 90 रुपये प्रति गड्डी इतका भाव मिळत आहे. दररोज त्यांच्या शेतातून मार्केटला 300 गड्डी जरबेरा फुले पाठवली जात आहेत. त्यामुळे यांना त्यातून वन टाइम इन्व्हेस्टमेंटमध्ये दररोज हजारो रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे त्या सांगतात.

error: Content is protected !!