Success Story : ‘पुणे तिथे काय उणे’ शेतकऱ्याने मलेशियाचा निळा तांदूळ पुण्यात पिकवला!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती क्षेत्रामध्ये झालेल्या आधुनिकीकरणामुळे सध्या शेतकऱ्यांकडून नवनवीन प्रयोग (Success Story) केले जात आहे. तंत्रज्ञानाची मदत घेऊन शेतकरी हे प्रयोग यशस्वी करून मोठ्या प्रमाणात उत्पन्नही मिळवत आहेत. त्यामुळे आता अशाच काहीशा आगळ्यावेगळ्या प्रयोगाची चर्चा (Success Story) पुणे जिल्ह्यात सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील चिखलगाव येथील एका शेतकऱ्याने मलेशिया आणि थायलंडमध्ये उत्पादित होणाऱ्या निळ्या तांदळाची लागवड यशस्वी करून दाखवली आहे.

मलेशियात होते उत्पादन

चालू खरीप हंगामात मुळशी तालुक्यातील चिखलगाव येथील शेतकरी लहू मारुती फाले यांनी निळया तांदळाची (Success Story) लागवड केली. आणि विशेष म्हणजे त्यांनी या निळ्या तांदळाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. हा निळा तांदूळ प्रामुख्याने मलेशिया आणि थायलंड या ठिकाणी देशांमध्ये उत्पादित होतो. त्याचा निळसर गडद जांभळ्या रंगाचा तांदूळ अनेकांना आकर्षून घेत असून, फाले यांच्या निळ्या तांदळाची चर्चा पंचक्रोशीत होत आहे. फाले यांनी केलेला हा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी हा तांदूळ उत्पादित करण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांचे विशेष मार्गदर्शन घेतले होते.

निळ्या तांदळाचे औषधी गुणधर्म (Success Story Of Blue Rice Farmer)

सेंद्रीय निळा तांदूळ आरोग्य वर्धक असून यात लोह, झिंक, कॅल्शिअम व भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. अँटीऑक्सिडंट शरीरातील फ्री रॅडिकल्सचे नुकसान कमी करतात. यामुळे कर्करोग, हृदयरोग, मधुमेह, अल्जाइमर यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. निळ्या भातामध्ये लोह, झिंक, कॅल्शिअम, फायबर आणि इतर अनेक पोषक तत्व असतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आरोग्य सुधारते. या तांदळाला बाजारात अधिक मागणी आहे.

किती मिळतो दर?

शेतकरी लहू मारुती फाले यांच्या या निळसर गडद जांभळ्या रंगाच्या तांदळाला प्रतिकिलो 250 रुपये बाजारभाव मिळत आहे. या निळ्या तांदळाची उंची साधारण सात फुटापर्यंत होते. हा तांदूळ 110 ते 120 दिवसांत काढणीसाठी तयार होतो. या तांदळाचे उत्पादन एक एकरात 1600 किलोपर्यंत होते. या निळ्या तांदळात औषधी गुणधर्म असल्यामुळे भात खरेदी करण्यासाठी शहरातील ग्राहक मोठ्या प्रमाणात या तांदळाला मोठी पसंती देत आहेत. तांदूळ लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी आपण सध्या प्रयत्नशील असून, या तांदळाची लागवड करण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागासह मी देखील मार्गदर्शन करू शकतो. असे शेतकरी फाले यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!