Success Story : 3 बिघ्यात गुलाब फुलाची शेती; शेतकरी मिळवतोय वर्षाला 3 ते 4 लाखांचा नफा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात फुलशेतीला व्यावसायिक शेतीचे (Success Story) स्वरूप प्राप्त झाले आहे. विविध फुलांच्या शेतीच्या माध्यमातून शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळवत आहेत. विशेष म्हणजे फुलांना बाजारात नेहमीच मागणी असल्याने, शेतकऱ्यांना त्यातून मोठी आर्थिक कमाई देखील होत आहे. आज आपण अशाच एका फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांना केवळ तीन बिघ्यातील गुलाब फुलशेतीतून वार्षिक 3 ते 4 लाखांचा निव्वल नफा (Success Story) मिळत आहे. ज्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यास मदत झाली आहे.

तुलनेने उत्पादन खर्च कमी (Success Story Of Gulab Farming)

अमन असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तरप्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील सहेलिया गावचे रहिवासी (Success Story) आहेत. तरुण शेतकरी अमन सांगतात, आपण सुरुवातीला एका बिघ्यात गुलाब शेती फुलवली. त्यातील यश पाहता सध्या आपण 3 बिघे जमिनीत गुलाब फुलांची लागवड केली आहे. फळे, भाजीपाला किंवा मग पारंपारिक पिकांच्या तुलनेत गुलाब फुलाच्या लागवडीस फारसा उत्पादन खर्च नसतो. गुलाब फुलाच्या शेतीसाठी कीटकनाशक वापरण्याची गरज पडत नाही. किंवा मग भरमसाठ रासायनिक खते वापरण्याची गरज पडत नाही.

किती आला उत्पादन खर्च?

शेतकरी अमन सांगतात, आपण यापूर्वी धान, गहू यांसारख्या पारंपारिक पिकांच्या माध्यमातून शेती करत करायचो. मात्र, त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. ज्यामुळे आपण गुलाब शेतीकडे (Success Story) वळलो. त्यानुसार सध्या आपल्याला तीन बिघ्यात गुलाब लागवडीसाठी एकूण 25 ते 30 हजार रुपये इतका खर्च आला. गुलाब फुलाच्या शेतीसाठी केवळ सुरुवातीला कलमद्वारे रोपे तयार करण्यासाठी खर्च येतो. त्यानंतर लागवडीसाठी मजुरी लागते. यापुढे मात्र, पुढील २० वर्षांसाठी गुलाब झाडे तुम्हाला फुलांचे भरघोस उत्पादन देऊ शकतात. वर्षातून दोन वेळा ८ महिने गुलाब फुलांचा हंगाम सुरु असतो. तर वर्षभर इतर चार महिन्याच्या कालावधीत थोड्याफार प्रमाणात फुले सुरूच राहतात.

किती मिळतंय उत्पन्न?

अमन सांगतात, गुलाब शेती अनेक प्रकारे केली जाऊ शकते. यामध्ये रोपे लावून, तर कलम पद्धतीने देखील गुलाब लागवड होते. आपण आपल्या शेतीत कलम पद्धतीने रोपे तयार करून गुलाब लागवड केली. लागवडीपूर्वी जमिनीची तीन वेळा चांगली मशागत करून घेतली. या दरम्यान जमिनीत चांगले शेतखत मिसळून घेतले. त्यानंतर आपण एक ते दीड फूट असे अंतर ठेऊन गुलाब रोपांची लागवड केली. विशेष म्हणजे केवळ तीन महिन्यातच आपल्याला फुलांचे उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सध्या आपल्याला दरवर्षी गुलाब फुलाच्या 3 बिघे लागवडीतून 3 ते 4 लाखांचा निव्वळ नफा सहज मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!