Success Story : 5 बिघ्यात गुलाब फुलाची लागवड; ‘हा’ शेतकरी करतोय महिना 1 लाखाची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला फुलशेतीला (Success Story) विशेष महत्व प्राप्त झाले आहे. ज्यामुळे सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी पारंपारिक पिकांऐवजी फुलशेतीकडे वळत आहे. यात प्रामुख्याने शेतकरी गुलाब, झेंडू, जरबेरा आणि शेवंती यांची आधुनिक पद्धतीने लागवड करत आहे. शेतकऱ्यांना या फुलांच्या लागवडीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका आधुनिक पद्धतीने फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी आपल्या 1 हेक्टर शेतीमध्ये आधुनिक पद्धतीने पॉलीहाऊसची उभारणी करत गुलाब शेती (Success Story) फुलवली आहे. ज्यातून ते महिन्याला 1 लाखांची कमाई करत आहे.

हेक्टरी 30 हजार रोपांची लागवड (Success Story Gulab Flower Farming)

उत्तरप्रदेशातील बिजनोर जिल्हा प्रामुख्याने ऊस पिकासाठी विशेष प्रसिद्ध आहे. मात्र, शेतकरी परमिंदर यांनी वेगळा मार्ग निवडत, फुलशेतीची (Success Story) वाट धरली. यासाठी त्यांनी आधुनिक शेती पद्धतीचा मार्ग निवडला. शेतीमध्ये पॉलीहाऊस उभारून त्यामध्ये गुलाब फुलाची लागवड केली. सुरुवातीला त्यांनी एका एकरमध्ये गुलाब फुलांची लागवड केली होती. मात्र, गुलाब फुलशेतीतील यश पाहता त्यांनी आज एका हेक्टरपर्यंत फुलशेती फुलवली आहे. यामध्ये त्यांना एका हेक्टरसाठी 30 हजार रोपे लागल्याचे ते सांगतात.

ठिबक/जैविक पद्धतीचा अवलंब

शेतीमध्ये सध्या आधुनिक पद्धतींचा वापर (Success Story) होत असताना शेतकरी परमिंदर देखील सर्व आधुनिक साधनांचा वापर करत आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण 5 बिघे रानात ठिबक सिंचन प्रणाली उभारली आहे. ज्यामुळे त्यांना कमी पाण्यात अधिक उत्पादन घेणे शक्य होत आहे. याशिवाय झाडांना देखील आवश्यक तितकेच पाणी मिळून, चांगले उत्पादन मिळण्यास मदत आहे. परमिंदर यांनी म्हटले आहे आपण शेती करताना प्रामुख्याने जैविक पद्धतीने खतांच्या वापरावर अधिक भर देत आहोत. साधारणपणे चार महिन्यानंतर गुलाब शेतीतून फुले तोडणीला येतात. त्यामुळे एकदा लागवड केल्यानंतर वर्षभर फुले मिळण्यास सुरुवात होते.

कुठे पाठवतात फुल विक्रीला?

शेतकरी परमिंदर सांगतात, गुलाब शेती करताना वन टाइम इन्व्हेस्टमेंट करावी लागते. त्यामुळे अधिक काळापर्यंत त्यांना उत्पन्न मिळण्यास मदत होते. आपण बाजारात आपल्या फुलांचा ब्रँड तयार केला असून, त्यास “टाटा रोज” असे नाव दिले आहे. तर आपण आपल्या फार्म्सचे नाव परमिंदर फार्म्स ठेवले आहे. गुलाब तोडणीसाठी आणि नियमित कामासाठी आपल्याकडे 4 जण कायमस्वरूपी कामाला असल्याचे ते सांगतात. परमिंदर सांगतात, गुलाब तोडणीनंतर आपण आपला सर्व माल व्यवस्थित पॅकिंग करून मुरादाबाद, मीरापुर, दिल्ली, गाजीपुर या महत्वाच्या शहरांमधील फुल मार्केटला पाठवतो. ज्यातून आपला सर्व खर्च वजा मासिक 1 लाख रुपयांची कमाई होत असल्याचे त्यांनी शेवटी म्हटले आहे.

error: Content is protected !!