Success Story : स्वित्झर्लंडमधील नोकरीला लाथ मारून ‘या’ व्यक्तीने सुरू केली केळीची शेती, कमावतोय लाखो रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Success story : सध्या अनेकजण फळबाग लागवड करताना दिसतात यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे अनेकजण नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतात. सध्या अनेकजण केळीची लागवड करून चांगले पैसे कमावत आहेत. आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत, ज्याने परदेशात चांगली नोकरी सोडून भारतात येऊन केळीची शेती सुरू केली आणि काही वेळातच करोडो रुपयांचे साम्राज्य उभे केले.

आलोक अग्रवाल असे या शेतकऱ्याचे नाव आहे. तो मुंबईचा रहिवासी आहे. यापूर्वी आलोक स्वित्झर्लंडमधील बनाना एक्सपोर्टमध्ये लॉजिस्टिकचे काम करायचे. येथे त्यांनी केळीच्या निर्यात-आयातीची संपूर्ण माहिती मिळवली. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून भारतात येऊन केळीचा व्यवसाय सुरू केला. 2015 मध्ये त्यांनी ट्रायडेंट अॅग्रो नावाची कंपनी सुरू केली. त्यानंतर त्यांनी या कंपनीच्या माध्यमातून भारतात केळी निर्यात करण्यास सुरुवात केली. आणि आज ते चांगले पैसे कमवत आहेत.

कंपनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगद्वारे केळीची लागवडही करते

महत्वाची गोष्ट म्हणजे ही कंपनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगद्वारे केळीची शेती देखील करते. केळी निर्यात करण्यासोबतच आलोक अग्रवाल चिप्स आणि स्नॅक्स देखील बनवतात. यासोबतच ते केळीचे इतर पदार्थही बनवतात. सध्या त्यांच्या कंपनीची वार्षिक 100 कोटी रुपयांची उलाढाल आहे.

केळीला किती बाजारभाव मिळतो?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर केळीला किंवा इतर शेतमालाला किती बाजारभाव मिळतो याबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर लगेचच Hello Krushi हे अँप मोबाईलमध्ये डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही रोजचे बाजारभाव त्याचबरोबर हवामान अंदाज, पशूंची खरेदी विक्री, जमीन मोजणी, सातबारा उतारा याची देखील माहिती घेऊ शकता. तेही अगदी मोफत त्यामुळे लगेचच Hello Krushi हे अँप मोबाईलमध्ये डाउनलोड करा.

100 कोटी रुपयांची कंपनी केली स्थापन

विशेष बाब म्हणजे कंपनी सुरू केल्यानंतर आलोक अग्रवाल यांनी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केळी लागवडीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली, ज्यामुळे केळीचे उत्पादन वाढले. यासोबतच चांगल्या प्रतीची केळी कशी पिकवायची आणि ती दीर्घकाळ सुरक्षित राहावीत यासाठी त्यांची साठवणूक कशी करायची हेही त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. प्रथमच त्यांनी शेतकऱ्यांना फळांच्या काळजीचे महत्त्व सांगितले. यामुळेच शेतकऱ्यांची मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर आलोकने 100 कोटी रुपयांची कंपनी स्थापन केली. सध्या यामुळे त्यांचे सगळीकडे कौतुक देखील होत आहे.

error: Content is protected !!