Success Story : इस्रायली पद्धतीने आंबा उत्पादन; शेतकरी करतोय वर्षाला 5 लाखाची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आंबा (Mango) उत्पादक शेतकऱ्यांची (Success Story) संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्याच्या घडीला बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होत असून, दरही चांगला मिळत आहे. ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. आज आपण अशाच एका आंबा उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी दशेरी (Dusheri) या आंबा प्रजातीच्या माध्यमातून, वार्षिक 5 लाखांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या आंब्याला एग्जॉटिक मिल्की व्हाइट दशेरी आंबा असे नाव दिले असून, हा आंबा (Success Story) अधिक काळापर्यंत टिकतो.

तीन वर्षांपासून करतायेत आंबा शेती (Success Story Farmer Earning 5 Lakhs Per Year)

उमंग गुप्ता असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तरप्रदेशातील लखनऊ जिल्ह्याच्या मलिहाबाद परिसरात आपली शेती करतात. ते मागील तीन वर्षांपासून इस्रायली पद्धतीने आंबा पिकाचे उत्पादन (Success Story) घेत आहेत. उमंग गुप्ता सांगतात, “इस्रायली पद्धतीने शेती (Israili farming) करताना प्रामुख्याने तीन गोष्टींवर काम करावे लागते. पहिले म्हणजे झाडांची छाटणी, दुसरे म्हणजे झाडांची जमीन आणि सर्व प्रकारची गरज पूर्ण करणे आणि तिसरे म्हणजे आंबा उत्पादन पिशवी पद्धतीने बांधणे. ज्यामुळे त्यांना गुणवत्तापूर्वक उत्पादन घेण्यास मदत झाली आहे. सामान्यपणे आंबा 3 ते 4 दिवस टिकतो. मात्र, इस्रायली तंत्रज्ञानाच्या मदतीने आंबा 15 ते 20 दिवस टिकवला जाऊ शकतो. परिणामी, इस्रायली पद्धतीने शेतकऱ्यांना निर्यातक्षम उत्पादन घेण्यास मदत होते.”

आकाराने 25 टक्के मोठा

शेतकरी उमंग गुप्ता सांगतात, आपण दशेरी आंब्याला एग्जॉटिक मिल्की व्हाइट दशेरी आंबा असे नाव दिले आहे. कारण हा आंबा सामान्य दशेरी आंबा नसून, तो इस्रायली पद्धतीने उत्पादित करण्यात आला आहे. आपल्या आंब्यावर एकही डाग नसून, तो सामान्य आंब्यापेक्षा आकाराने 25 टक्के मोठा आहे. याशिवाय त्याची चव देखील उत्तम आहे. आपल्याकडील दशेरी आंबा हा दुधिया रंगाचा आहे. त्यामुळे आपण त्याला एग्जॉटिक मिल्की व्हाइट दशेरी आंबा असे नाव दिले आहे.

किती मिळाले उत्पादन?

शेतकरी उमंग गुप्ता सांगतात, आपण मागील तीन वर्षांपासून इस्रायली पद्धतीने आंबा शेती करत आहोत. मागील वर्षी आपल्याला 4 लाखांचा निव्वळ नफा मिळाला होता. मात्र, यंदा 10 लाख डझन इतके एकत्रित उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय आपल्याला यंदाच्या संपूर्ण हंगामात सरासरी 500 रुपये प्रति डझन इतका दर मिळण्याचा अंदाज आहे. त्यातून आपल्याला यंदाच्या वर्षी आंबा पिकातून एकूण 5 लाख रुपये इतके उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, एप्रिल ते जुलै या चार महिन्याच्या कालावधीत बाजार आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, कार्बोहायड्रेट्स, कॅलरी, प्रोटीन, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, बी 6 उपलब्ध असते.

error: Content is protected !!