Success Story : कडू कारल्याची गोड कहाणी; वाघ बंधू दरवर्षी मिळवतायेत बक्कळ नफा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सर्वच भागांमध्ये सध्या भाजीपाला शेतीला (Success Story) मोठे महत्व प्राप्त झाले आहे. भाजीपाल्याला बाराही महिने मागणी असल्याने, त्यास मिळणारा भावही चांगला असतो. परिणामी सध्याच्या घडीला राज्यातील शेतकरी भाजीपाला पिकांमधुन मोठ्या प्रमाणात नफा मिळवताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील ईश्वर वाघ व महेंद्र वाघ या दोन शेतकरी बंधूंनी देखील कारले या पिकातून आर्थिक प्रगती साधली आहे. आज आपण त्यांच्या कारल्याच्या शेतीतील यशाबाबत (Success Story) जाणून घेणार आहोत.

आधुनिक पद्धतींचा वापर (Success Story Vegetable Farming)

ईश्वर वाघ व महेंद्र वाघ हे दोघे बंधू दौंड तालुक्यातील पारगाव येथे आपली शेती करतात. ते दरवर्षी कारल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवतात. एखादे वर्ष वगळता दरवर्षी आपण कारले पिकातून नफ्यात (Success Story) असल्याचे ईश्वर वाघ यांनी सांगितले आहे. ईश्वर वाघ सांगतात, आपण मल्चिंगच्या आधारे कारल्याची लागवड केली. शेतीची मशागत करताना पोल्ट्री खताचा वापर केला. वाघ यांच्या घरी मुक्त गाईंचा गोठा आहे. त्यातील शेण खताचा डोस त्यांनी दिला. त्यामुळे कारल्याचे दर्जेदार पीक उभे राहिले. शेतीमध्ये त्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचे जाळे उभारले आहे.

पावणेदोन एकरात कारल्याची लागवड

ईश्वर वाघ सांगतात, “जमिनीला मोजके पाणी दिल्यास व ठिबक सिंचनचा वापर करताना योग्य ठिकाणी खताचा वापर होतो. पीक जोमाने वाढते. पिकाची रोगप्रतिकारशक्ती त्यामुळे चांगल्या पद्धतीने होते. मल्चिंग केल्यामुळे खुरपणीचा खर्च वाचत आहे. मल्चिंगचा दुसरा फायदा जमीन पाण्याला लवकर येत नाही. एकूण पावणेदोन एकरामध्ये वाघ यांनी कारल्याची लागवड केली आहे.” परिसरातील प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

पीक विविधतेला महत्व

ईश्वर वाघ सांगतात, “तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून कमीत कमी मजुरी कशी लागेल, याकडे लक्ष दिले जाते. सध्या तोडणी व औषध फवारणी या दोनच कामांसाठी मजुरांचा वापर केला जातो. आपले कलिंगडाचे पिक देखील दरवर्षी भारदस्त असते. शेतीमध्ये एकाच पिकावर अवलंबून राहणे चुकीचे आहे वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेतले तर हमखास नफा (Success Story) मिळतो, असेही वाघ सांगतात.

शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने गौरव

ते कांदा, फ्लावर, कलिंगड, कारले, काकडी यासारखे विविध प्रकारची पिके ते घेतात. उसामध्ये फ्लावर सारखे आंतरपिके घेतात. त्यामुळे उसाचा मशागतीचा खर्च याच पिकातून निघतो. अंतर्गत पिकाचा उपयोग मशागती बरोबरच कुजवल्यास खतासारखा देखील होतो. रासायनिक खताबरोबर जैविक खताचा देखील वापर करतात. ईश्वर वाघ यांना शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोगाबद्दल ‘शेतीनिष्ठ शेतकरी’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

error: Content is protected !!