Success Story : शेतकऱ्याची कमाल! शिमला मिरचीच्या एक एकर शेतीतून दोन महिन्यात केली लाखोंची कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Success Story : शेती करताना शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो तरी देखील शेतकरी शेती करत असतात. मात्र यामध्ये जर शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून बाजाराचा अभ्यास करून शेती केली तर नक्कीच शेतीमधून शेतकऱ्याला चांगले पैसे मिळू शकतात. याचाच एक उत्तम उदाहरण म्हणजे वाशिमच्या एका शेतकऱ्याने बाजारभावातील चढ उताराचा अभ्यास करून शिमला मिरचीच्या उत्पादन उत्पादनातून लाखो रुपयांची कमाई केली आहे.

योग्य नियोजनाने केली शिमला शेती

सध्या निसर्गावर कोणाचाही भरोसा राहिला नाही, कधी नैसर्गिक संकट येईल हे शेतकऱ्यांना ही माहीत नसतं. त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेती करताना यांत्रिकीकरण, रासायनिक खतांचे वाढलेले दर त्याचबरोबर बाजारभावात होणारे चढ उतार यामुळे शेती व्यवसाय बेभरवाशी झाला आहे. मात्र योग्य नियोजन करून आणि बाजारातील अभ्यास करून व्यवस्थित नियोजन केले तर शेतीतून देखील चांगले उत्पन्न घेता येते. हे सिद्ध केले आहे वाशिमच्या जवळा येथील एका युवा शेतकऱ्याने. ज्ञानेश्वर गवळी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्यांने शिमला मिरचीचे पीक घेत एका एकरातून चांगले उत्पन्न काढले आहे.

माहितीनुसार या शेतकऱ्याला शिमला मिरचीसाठी जवळपास दीड लाख रुपयांचा खर्च आला या शेतकऱ्याला सध्या शिमला मिरची फवारणीसाठी आणि तोडणी साठी खर्च येत असल्याचे म्हटले आहे. त्यांची मिरची ही व्यापारी थेट शेतातून घेऊन जात असतात. त्यामुळे त्यांना वाहतुकीचा खर्च येत नाही त्यामुळे त्यांना किलोमागे सात ते आठ रुपयांचा फायदा होत आहे.

किती केली कमाई

ज्ञानेश्वर गवळी या शेतकऱ्याने आपल्या शेतातून आतापर्यंत मिरचीचे तीन तोडे केले आहेत. त्यांनी आतापर्यंत जवळपास तीन लाख रुपयांची कमाई केल्याची माहिती मिळत आहे. मात्र अजूनही चार-पाच तोडे त्यांना अपेक्षित आहेत. त्यामुळे मिरचीतून येणार उत्पन्नही तोडणी खर्च वगळता निव्वळ नफा राहणार असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणं आहे

लागवड कशी केली?

या शेतकऱ्याने शिमला मिरची लावण्यासाठी एक एकर मध्ये शेतात नांगरणी करून बेड तयार केले. त्यानंतर त्यावर मल्चिंग पेपर टाकून शिमला मिरचीची लागवड करण्यात आली. 15 जूनला या शेतकऱ्याने शिमला मिरचीची लागवड केली आहे आणि आत्ता मिरचीला सव्वा दोन महिने झाले असून त्यांनी पहिला तोडा 23 क्विंटलचा विकला त्याला जवळपास 32 रुपये भाव मिळाला होता. त्यानंतर मिरचीचे त्यांचे उत्पादन चालू झाले आणि आता चांगला भाव मिळत असून ते चांगली कमाई करत आहेत.

error: Content is protected !!