Success Story : नोकरी सोडून थाई पेरुची लागवड; ‘हा’ शेतकरी करतोय एकरी 6 लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या दशकभरापासून तरुणांचा शेतीकडे ओढा (Success Story) वाढला असून, हे तरुण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसून येत आहे. पारंपारिक पिकांऐवजी तरुण फळ पिकांना प्राधान्य देत असल्याने, त्यातून त्यांना कमाई देखील अधिक होत आहे. आज आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेतीची वाट धरली. पारंपारिक पिकांच्या मागे न लागता. या तरुणाने पेरू पिकाची निवड करत, त्यातून आपली आर्थिक प्रगती (Success Story) साधली आहे.

खासगी नोकरी सोडली (Success Story Left Job Earn 6 Lakhs Per Acre)

राजीव भास्कर असे या तरुणाचे नाव असून, ते हरियाणातील राज्यातील रहिवासी आहेत. राजीव यांच्या पेरू शेतीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची स्वतःची कोणतीही शेती नसून, त्यांनी भाड्याने शेती घेऊन पेरू बागेतून उत्पन्न (Success Story) मिळवले आहे. विशेष म्हणजे राजीव हे एका मोठ्या खासगी कंपनीत काम करत होते. मात्र, नोकरीत मन रमत नसल्याने, त्यांनी शेतीमध्ये येण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय खरा करून दाखवत, शेतीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना ते वार्षिक एकरी 6 लाखांची कमाई करत आहे.

थाई पेरुची लागवड

सुरवातीला राजीव यांनी 2017 मध्ये हरियाणातील पंचकुला या ठिकाणी पाच एकर जमीन भाड्याने घेत पेरूची बाग फुलवली. त्या ठिकाणी त्यांनी 2021 पर्यंत 20 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. तर त्यानंतर त्यांनी सध्या पंजाबमधील रूपनगर जिल्ह्यात 25 एकर जमिनी भाड्याने घेऊन त्यावर थाई पेरुची बाग फुलवली आहे. ही पेरूची लागवड करताना त्यांनी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला आहे. ते आपल्या पेरू बागेसाठी कोणत्याही रासायनिक खतांचा वापर करत नाहीत. तसेच किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी राजीव भास्कर यांनी पेरुच्या बागेला थ्री-लेअर बॅगिंग तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे.

किती मिळतंय उत्पन्न?

2017 मध्ये त्यांनी पंचकूला येथे लावलेल्या पेरू बागेतून त्यांना कोरोना महामारीच्या काळापर्यंत 20 लाखांचा निव्वळ नफा मिळाला होता. त्यांनतर त्यांनी त्या ठिकाणचा करार संपुष्टात आणला. रुपनगर येथील 25 एकर जमिनीत सध्या त्यांनी थाई पेरूची लागवड केली असून, त्यांना वार्षिक एकरी 6लाखांची कमाई सहज मिळत असल्याचे ते सांगतात. आपण नोकरी सोडून शेतीत येण्याचा घेतलेला निर्णय सार्थ ठरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील पारंपरिक पद्धतींना फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती केल्यास, त्यातून त्यांना नक्कीच अधिकचा फायदा मिळेल, असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.

error: Content is protected !!