Success Story : विदेशात शिक्षण, नोकरी सोडली; भाजीपाला शेतीतून करतीये लाखोंची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील सुशिक्षित तरुणांचा (Success Story) ओढा सध्या शेतीकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशातच एका उच्चशिक्षित तरुणीची जोरदार चर्चा सुरु आहे. लंडन या ठिकाणी विदेशात उच्च शिक्षण घेतलेली ही मुलगी भारतात येऊन आधुनिक पद्धतीने शेती करत आहे. हे ऐकून तुम्हीही विचारात पडले असाल, मात्र हे पूर्णतः खरे आहे. आज महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात मुली शेतीला दुय्यम मानत असताना, ‘पूर्वी मिश्रा’ नावाच्या या मुलीने विदेशात शिक्षण घेऊन, मायदेशी येत शेतीची वाट (Success Story) धरली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावत आहेत.

कशी धरली शेतीची वाट? (Success Story Of Women Farmer)

पूर्वी मिश्रा असे या तरुण शेतकरी मुलीचे नाव असून, ती मध्यप्रदेशातील इटावा जिल्ह्यातील फूफई गावची रहिवासी आहे. पूर्वी मिश्रा हिने 2012 साली आपली एमबीएची पदवी लंडन या ठिकाणाहून पूर्ण केली आहे. त्यानंतर तिने विदेशात राहूनही बी.टेकची पदवी देखील मिळवली. एमबीए आणि बीटेकचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मायदेशी परत आल्यानंतर, तिने काही काळ खासगी कंपन्यांमध्ये नोकरीही केली. अशातच 2019 मध्ये कोरोना महामारीमुळे सर्व जग थांबलेले असताना, पूर्वीची नोकरी करताना घुसमट होऊ लागली. त्यामुळे एका बाजूला शेती परवडत नसल्याचे ऐकायला येत असतानाच्या परिस्थितीत, पूर्वी या उच्चशिक्षित तरुणीने शेतीची वाट धरली. विशेष म्हणजे तिने ही वाटचाल मागील काही वर्षांमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.

बाजारभावानुसार पिकाची निवड

पूर्वी हिने आपल्या शिक्षणाचा वापर शेतीमध्ये करण्याचा निर्धार मनाशी (Success Story) पक्का केला. यासाठी तिने इस्राईलमध्ये होणाऱ्या हायड्रोफोनिक या आधुनिक तंत्रज्ञानाची इतंभूत माहिती मिळवली. मध्यप्रदेशातील इटावा या ठिकाणी पूर्वीने आपल्या 5 हजार स्केअर फूट जागेत इस्राईली तंत्रज्ञानाच्या मदतीने ही शेती उभारली आहे. ज्यात ती बाजारभावाचा अंदाज घेऊन भाजीपाल्याची शेती करत आहे. ती अनेक विदेशी भाजीपाल्याची देखील लागवड आपल्याला शेतीत करत आहे. बाजारात अंदाज घेतल्याने तिच्या भाजीपाल्याला चांगला दर मिळत असून, तिला त्यातून लाखोंचा नफा देखील होत आहे.

उच्चभ्रू लोकांमध्ये मोठी मागणी

पूर्वी मातीविरहित शेती करत असून, भाजीपाला उत्पादन करताना त्यासाठी कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत किंवा कीटकनाशकांचा वापर करत नाही. त्यामुळे जैविक पद्धतीने पिकवलेल्या तिच्या भाजीपाल्याला ग्राहकांमध्ये मोठी पसंती असल्याचे ती सांगते. तिच्या शेतात उत्पादित होणारा भाजीपाला हा केवळ जिवाणूरहित पाण्यावर (आरओ वॉटर – जलशुद्धीकरण केलेले पाणी) पिकतो. या पद्धतीने पिकवलेलया भाजीपाल्याला सध्या उच्चभ्रू लोकांमध्ये मोठी मागणी असल्याचे पूर्वी सांगते. ज्यातून तिला कमी खर्चात लाखोंचा नफा मिळत आहे.

कोणत्या भाज्यांची लागवड?

ती मुख्यतः रोमेन, बटर हेड, ग्रीक ओक, रेड ओक, लोवेज, बोक चॉय या विदेशी भाज्यांची लागवड करते. ज्यांना उच्चभ्रू लोकांमध्ये मोठी मागणी असते. याशिवाय तुळस, ब्रोकोली, लाल शिमला मिरची, पिवळी शिमला मिरची, चेरी, टोमॅटो यांचे देखील उत्पादन घेते. इतकेच नाही तर हिरव्या पालेभाज्यांमध्ये ती पालक, मेथी, कोथिंबीर, कोबी, फ्लावर यांचे देखील मागणीनुसार उत्पादन घेते. विशेष म्हणजे हा सर्व भाजीपाला पिकवण्यासाठी ती मातीचा कोणताही वापर करत नाही. केवळ जलशुद्धीकरण केलेले पाणी आणि नारळाच्या दशांचा ती वापर करते.

error: Content is protected !!