Success Story : औषधी वनस्पतींच्या लागवडीतून शेतकऱ्याने साधली प्रगती; वार्षिक 15 लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतकरी औषधी वनस्पतींच्या लागवडीकडे (Success Story) मोठ्या प्रमाणात वळत आहे. औषधी वनस्पतींना वैद्यकीय आणि औषधनिर्माण क्षेत्रात मोठी मागणी आहे. औषधी वनस्पतींना शेतकऱ्यांचे मनी क्रॉप म्हटले जाते. याशिवाय सौंदर्य प्रसाधनांच्या निर्मितीमध्ये देखील औषधी वनस्पतींना मोठी मागणी आहे. ज्यामुळे शेतकरी एखाद्या नामांकित कंपनीसोबत जोडले जाऊन, औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात शेती करू शकतात. आज आपण अशाच एका औषधी वनस्पतींची यशस्वी शेती करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. जे आपल्या औषधी वनस्पतींच्या लागवडीतून (Success Story) वार्षिक १५ लाखांची कमाई करत आहे.

110 प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड (Success Story Medicinal Plants)

शंभू शरण भारती असे या शेतकऱ्याचे नाव (Success Story) असून, ते बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. शेतकरी शंभू शरण भारती हे पारंपारिक शेतीला फाटा देत औषधी वनस्पतींच्या शेतीकडे वळले. आज त्यांनी सव्वा बिघा जमिनीत ११० प्रकारच्या औषधी वन्पस्पतींची लागवड केली आहे. यामध्ये अश्वगंधा, काळी हळदी, एरंड, तुळस, शतावरीसह अन्य औषधी वनस्पतींची लागवड त्यांनी केली आहे.

का वळाले औषधी वनस्पतींकडे?

विशेष म्हणजे सर्व औषधी वनस्पती शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या वनस्पती आहेत. विशेष म्हणजे एकदा केवळ संपूर्ण सव्वा जमिनीत त्यांनी शतावरीची लागवड (Success Story) केली होती. ज्यातून त्यांना जवळपास १० लाख रुपयांपर्यत उत्पन्न मिळाले होते. शेतकरी शंभू शरण भारती यांच्या कुटुंबात एकूण ९ सदस्य असून, या सर्वांची जबाबदारी त्यांच्यावर होती. ज्यामुळे त्यांना पाच मुलींसोबतच, दोन मुलांच्या चांगल्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर होती. ज्यामुळे त्यांना कमी जमिनीत अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांची लागवड करणे क्रमप्राप्त होते. त्यातूनच ते औषधी वनस्पतींच्या लागवडीकडे वळले.

किती मिळतंय उत्पन्न?

शेतकरी शंभू शरण भारती सांगतात, औषधी वनस्पतींच्या लागवडीनंतर (Success Story) आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. केवळ एका बिघाभर जमिनीमधून आपल्याला औषधी वनस्पतींच्या लागवडीतून वार्षिक १५ लाखांची कमाई होत आहे. ज्यातून आपण मुलांना चांगले शिक्षण देत, त्यांच्या पायावर उभे केले आहे. यात एका मुलीला बीडीओ, दोन मुलींना शिक्षिका, दोन्ही मुलांना इंजिनिअर केले आहे. परिणामी आपण औषधी वनस्पतींची लागवड केली नसती तर मुलांना या स्टेज पोहचवू शकलो नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक आर्थिक उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या लागवडीकडे वळले पाहिजे, असे त्यांनी शेवटी म्हटले आहे.

error: Content is protected !!