Success Story : मशरूम शेतीतून शेतकऱ्याने साधली प्रगती; करतोय लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि जमिनीचे कमी होत चालले प्रमाण यामुळे शेतकरी (Success Story) शेती करण्यापासून दुरावत आहे. अशा परिस्थितीत मशरूम शेती (Success Story) हा शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय ठरत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यातून मदत होत आहे. मशरूम शेतीतून स्वतःची ओळख निर्माण केलेल्या अशाच एका शेतकऱ्याची आज आपण यशोगाथा पाहणार आहोत…

6 ते 7 लाखांचा नफा (Success Story Of Mushroom Farming)

हरियाणामधील सोनिपत जिल्ह्यातील शेतकरी रणवीर सिंह असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते खासगी क्षेत्रात नोकरी करत होते. मात्र त्यातून त्यांना आपले कुटुंब चालवणे अवघड जात होते. त्यामुळे त्यांनी काहीतरी वेगळे करावे असा ध्यास मनाशी बाळगला. त्यातूनच त्यांना मशरूम शेतीबाबत माहिती मिळाली. गेल्या 25 वर्षांपासून ते मशरूम शेती करत असून, त्यातून जवळपास सहा ते सात लाखांची वार्षिक कमाई करत आहे. त्यांच्या मशरूम शेतीमुळे आसपासच्या अनेक शेतकऱ्यांना मशरूम शेतीकडे वळण्याची प्रेरणा मिळत आहे.

कमी खर्चात जास्त नफा

जाणकारांच्या मते, गेल्या काही वर्षांमध्ये मशरूम लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बाजारामध्ये मशरूमला अधिक दर मिळतं असल्याने शेतकरी मशरूम शेतीकडे वळत आहे. विशेष म्हणजे कमी जागेत आणि कमी खर्चात मशरूमची लागवड होते. मात्र त्यातून मिळणारा नफा हा अधिक पटीने आहे. त्यातच कृषी विज्ञान केंद्रात किंवा कृषी विद्यापीठामध्ये याचे प्रशिक्षण दिले जात असल्याने शेतकऱ्यांना याचा विशेष फायदा होत आहे.

मशरूमला विशेष मागणी

आपल्या देशामध्ये मशरूमचा वापर आहारात आणि औषधी उपयोगांसाठी होत आहे. यामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, खनिज क्षार आणि जीवनसत्त्वे यांचे प्रमाण अधिक असल्याने उच्चभ्रू लोकांमध्ये मशरूमला विशेष मागणी असते. याशिवाय भारतात मशरूमला खुंभ, खुंभी, भामोडी आणि गुच्ची नावांनी देखील ओळखले जाते. आपल्याकडे प्रामुख्याने पौष्टिक आहार म्हणून मशरूमचा वापर केला जातो. याशिवाय मशरूमपासून पापड, जिम सप्लिमेंट पावडर, लोणचे, बिस्किटे, टोस्ट, कुकीज, नूडल्स, जाम (अंजीर मशरूम), सॉस, सूप, खीर, ब्रेड, चिप्स, शेव, चकली यांसारखे पदार्थ देखील बनवले जातात.

error: Content is protected !!