सहा एकर जमिनीचे तीन भाग करून घेतले सोयाबीनचे पीक; मिळवले एकरी 9 क्विंटल उत्पन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी | करोनाचा प्रभाव आणि लॉकडाऊन यामुळे अनेक क्षेत्रावर त्याचा विपरीत परिणाम झाला. यामध्ये शेती हे क्षेत्र सुद्धा समाविष्ट आहे. लॉकडाऊनमध्ये शेतीपूरक साधने आणि वस्तू यांचा अभाव, यासोबतच मार्केट आणि वाहतूक बंद असल्यामुळे पिकाचे झालेले नुकसान! यामुळे, शेतकरी खूप नुकसानीमध्ये आहे. अशाच काही शेतकऱ्यांच्या यशोगाथा कानी पडल्यामुळे इतर शेतकऱ्यांना सुद्धा आशेचा किरण मिळतो आहे. अशा समस्यावर मातकरून एका शेतकऱ्याने एका एकरामध्ये तब्बल नऊ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घेतले आहे.

विदर्भामध्ये उन्हाळ्याचे सोयाबीनचे उत्पन्न शेतकरी कमी प्रमाणात घेतो. कारण, उन्हाळा सुरु होताच मोठ्या प्रमाणावर पाण्याची समस्या तिकडे निर्माण होते. यामुळे, पावसाळा सुरू होण्याच्या काही दिवस आधी म्हणजे जूनच्या सुरुवातीला व नंतर जुलै महिन्यामध्ये नगदी पीक म्हणून सोयाबीनचे उत्पन्न घेतले जाते. आर्वी तालुक्यातील दौलतपुर शिवारामध्ये सुरेश वसंत कदम यांची सहा एकर शेती आहे. त्यात त्यांनी उन्हाळी सोयाबीन लावले होते. पण, त्यांना कापूस आणि सोयाबीन या पिकाने दगा दिला. त्यामुळे त्या चिंतित होते. त्यांनी खचून न जाता परत एकदा सोयाबीनचा घेण्याचे ठरले.

जमीन स्वच्छ करून दोन एकरामध्ये गायत्री सीड्स व इतर चार एकरामध्ये वेगवेगळ्या वरायटीचे बियाणे यांची पेरणी केली. मात्र 4 एकरामधील सोयाबीनला एक्वामधील सोयाबीनला कीड लागल्यामुळे 4 एराममधील संपूर्ण सोयाबीन वाया गेले. पण, 2 एकरामधील सोयाबीन चांगले आले होते. त्यामुळे, दोन एकरातील सोयाबीन 18 क्विंटल झाल्यामुळे परिसरामध्ये त्याची चर्चा झाली. व अनेक शेतकरी त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ लागले आहेत.

 

Leave a Comment

error: Content is protected !!