नोकरी सोडून सुरू केली द्राक्षांची शेती; उभारली देशातील सगळ्यात मोठी वाईनरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी | कोरोना विषाणूमुळे देशाच्या पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. या साथीचा सर्वात मोठा परिणाम महाराष्ट्रातील नाशिक येथे सुला वाईन यार्डलाही झाला. सुला जर तुम्हाला माहित नसेल तर, माहीत करून घ्या की तो भारतातील सर्वात मोठा वाईन ब्रँड आहे. त्यांच्या वाईनची मागणी परदेशात खूपच मोठ्या प्रमाणात आहे. आणि नाशिकमधील अनेक हजार एकर क्षेत्रावरील द्राक्षबाग लोकांना आकर्षित करते. सुला वाईनयार्डची सुरुवात 1999 पासून मुंबईपासून 180 किमी अंतरावर नाशिक येथे झाली. स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटीचे पदवीधर आणि पदव्युत्तर राजीव सामंत यांनी या व्हाइनयार्डची सुरूवात केली.

 

राजीव सामंत यांनी अमेरिकेच्या प्रतिष्ठित स्टॅनफोर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवी संपादन केली. मग अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. कॅलिफोर्नियामध्ये ओरॅकल बरोबर काम करणाऱ्या राजीव यांना अमेरिकेच्या भागातील आयुष्य आवडले नाही. गावातले जीवन जगण्याचा निर्णय घेतलेले राजीव भारतात परतले. राजीव यांनी आंबा लागवडीपासून गुलाब, सागवान लाकूड आणि द्राक्ष लागवडीपर्यंत सगळं केल. त्यांच्या कुटुंबाकडे नाशिक जवळील दिंडोरी गावात 20 एकर जमीन होती. 1996 मध्ये राजीव यांना समजले की नाशिकमधील हवामान द्राक्ष तयार करण्यासाठी योग्य आहे. यानंतर, जेव्हा ते परत कॅलिफोर्नियाला गेले तेव्हा त्यांनी प्रसिद्ध वाइनमेकर कॅरी डॅमस्की यांची भेट घेतली. कॅरी यांनी हे मान्य केले होते की, ते त्यांना व्हाइनयार्ड सुरू करण्यास मदत करतील. यानंतर राजीव आपली ओरॅकलमधील नोकरी सोडून भारतात परतले.

 

राजीव यांनी सुला त्यांच्या आईच्या नावाने(सुलभा) सुरू केले. पुढच्या काही वर्षांत कंपनीचा व्यवसाय वाढला आणि राजीव यांनी नवीन द्राक्षांची लागवड करण्यास सुरवात केली. पुढच्या दशकात, नाशिक विभाग पूर्णपणे बदलला आणि आज तो भारताची ‘नापा व्हॅली’ म्हणून ओळखला जातो. 20 एकर क्षेत्रात सुरू झालेली ही वाईनयार्ड आज 1800 एकर क्षेत्रात पसरली आहे. सुला वाईनयार्ड येथे दररोज 8 ते 9 हजार टन द्राक्षे पिळून वाइन तयार केली जाते. वाईनयार्ड्सचे मुख्य वाईन निर्माता करण वसाणी यांच्या म्हणण्यानुसार, येथे पांढरी आणि लाल वाईन तयार केली जाते. नाशिक हा महाराष्ट्राचा एक भाग आहे ज्याला आता सुलाने एक नवी ओळख दिली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!