Success Story : जी-9 केळी वाणाची लागवड; शेतकरी मिळवतोय वर्षाला 6 लाखांचा नफा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात केळीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या (Success Story) मोठ्या प्रमाणात आहे. राज्यात अगदी देश-विदेशातील नामांकित प्रजातीच्या माध्यमातून केळीची लागवड होते. बाजारात केळीला नेहमीच मोठी मागणी असल्याचे पाहायला मिळते. परिणामी, शेतकऱ्यांना केळी पिकातून अधिक उत्पादन मिळून, अन्य पिकांपेक्षा नफा देखील अधिक मिळतो. आज आपण अशाच एका केळी उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी आपल्या 6 बिघे जमिनीत केळी पिकाची लागवड केली असून, त्यातून त्यांना वार्षिक 6 लाखांचे निव्वळ उत्पन्न (Success Story) मिळत आहे.

पारंपारिक पिकांना फाटा (Success Story of Banana Farming)

विमल वर्मा असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तरप्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील रहिवासी आहे. शेतकरी विमल वर्मा हे सुरुवातीला पारंपारिक पिकांच्या माध्यमातून शेत करत होते. मात्र, त्यातून खूपच कमी उत्पन्न मिळत असल्याने, त्यांनी फळ पिकांकडे (Success Story) वळण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला 2 बिघे जमिनीत केळीची लागवड केली. त्यात मिळालेले यश पाहता, त्यांनी सध्याच्या घडीला 6 बिघे जमिनीत केळी पिकाची लागवड केली आहे. यासाठी त्यांनी जी-9 या प्रजातीच्या केळी निवड केली असून, त्यातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले आहे.

जी-9 या प्रजातीची वैशिष्ट्ये?

शेतकरी विमल वर्मा सांगतात, आपण जवळपास 15 वर्षांपूर्वी केळीची शेती करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी फारसा नफा होत नव्हता. मात्र, सध्या हळूहळू क्षेत्रामध्ये वाढ करत, सध्या आपण 6 बिघे जमिनीमध्ये केळी लागवड केली आहे. यासाठी आपण जी-9 वाणाची निवड केली असून, या वाणाची साईज ही इतर वाणांच्या तुलनेत अधिक असते. याशिवाय या वाणाची केळी ही खाण्यास देखील चविष्ट असतात. या वाणाचे एक रोप साधारणपणे 16 रुपयांना मिळते. तसेच या वाणाच्या मदतीने एक बिघ्यात 50 ते 60 क्विंटल उत्पादन सहज मिळत असल्याचे ते सांगतात.

किती मिळतंय उत्पन्न?

शेतकरी विमल वर्मा सांगतात, केळीची लागवड (Success Story) करताना रोपे लावण्यासाठी आपण सुरुवातीला दोन फुटांचे खड्डे खोदून घेतले. त्यात रोपे लावली. त्यानंतर नियमित पाणी देत, वाढीच्या अवस्थेत खते आणि कीटकनाशक फवारणी केली. ज्यामुळे केळीचे पीक लवकर उभे होण्यास मदत झाली. आपल्याला रोपांच्या लागवडीनंतर 13 ते 14 महिन्यात उत्पादन मिळण्यास सुरुवात झाल्याचे ते सांगतात. एका बिघ्यात केळीची लागवड करण्यासाठी जवळपास 20 हजार रुपये खर्च येतो. तर एका हंगामातील पिकापासून आपल्याला वार्षिक 6 लाखांचा निव्वळ नफा सहज मिळत असल्याचे ते सांगतात.

जैविक खतांचा वापर

केळीच्या शेतीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेणखताचा वापर करायला हवा. आपल्याला शेणखताच्या वापरामुळे रासायनिक खतांचा खर्च कमी करण्यात मोठी मदत झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय आपण केळी पिकाच्या काढणीनंतर जो मागे राहणारा पिकाचा कचरा आहे. तो इतरत्र न टाकता शेतातच डिकंपोस्ट करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्यामुळे आपल्या केळी पिकास जैविक खतांची पूर्तता होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी शेवटी म्हटले आहे

error: Content is protected !!