Success Story : नगरच्या मिरचीची युरोपला गोडी; एक एकरात शार्क वन जातीची लागवड!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकरी तेच ते पीक घेण्यापेक्षा पीक पद्धतीत बदल करून अधिक चांगले उत्पादन (Success Story) मिळवत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना त्यातून अधिक उत्पन्न देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी एक एकरात हिरव्या मिरचीचे पीक घेतले आहे. आता ती मिरची थेट ब्रिटनबरोबरच युरोपियन देशात निर्यात होत आहे. ज्यामुळे त्यांच्या या निर्यातक्षम मिरचीची (Success Story) सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

आधुनिक साधनांचा वापर (Success Story Of Chilli Farmer)

कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका येथील शेतकरी आनंद मालकर यांनी ही किमया साधली (Success Story) आहे. आनंद मालकर यांनी शेताची पूर्व मशागत करून शेतात एका एकरात पाच ट्रॉली शेणखत टाकले. शेतात ४.२५ फुटांवर समांतर वरंबा करून त्यात तीन गोण्या निंबोळी पेंड व ३ गोण्या डीएपी खत मिसळून दिले. त्याच अंतरावर ठिबक पसरविले व त्यावर मल्चिंग पेपर टाकून दीड फूट अंतरावर शार्क वन जातीची ७,५०० रोपे चालू वर्षी २८ जानेवारीला लावली होती.

नव्वद दिवसांत दोन टन उत्पादन

शार्क वन जातीच्या मिरचीचे झाड उंच वाढते. तसेच फांद्याही मोठ्या प्रमाणात डफळतात. त्यामुळे त्यांना आधार म्हणून बांबू व तार वापरली आहे. मागील पंधरा दिवसांपासून तोड सुरू झाली असून, केवळ नव्वद दिवसांत दोन टन उत्पादन निघाले आहे. अजून सहा महिने उत्पादन सुरू राहणार असून, दहा ते बारा टन उत्पादन निघण्याचा अंदाज मालकर यांनी व्यक्त केला आहे.

30 मजुरांना नियमित काम

आनंद मालकर यांची शार्क वन जातीची मिरची ही सध्या युरोपियन देशांत निर्यात होत असून, सध्या किलोला 55 ते 60 रुपये दर मिळत आहे. निर्यातक्षम मिरची बनविण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करावा लागतो. त्यासाठी शेणखत, गोमूत्र, गूळ यापासून बनविलेली 50 लीटर स्लरी ठिबकद्वारे दोन दिवसाआड सोडावी लागते. प्रत्येक ओळीच्या सुरुवातीला व शेवटी डोंडूची लागवड केली आहे. उन्हाचा, तसेच मध्याचा अटकाव करण्यासाठी शेताच्या चौहू बाजूने शेडनेटचा वापर केला आहे. तोडणीमुळे दररोज 30 मजुरांना काम मिळत आहे.

किती आला खर्च? किती होणार उत्पन्न?

“निर्यातक्षम मिरची निवडताना तिच्यातून लाल रंगाची, वाकडी असलेली, मिरचीचापाला यांना बाजूला करावे लागते. वीस किलोच्या वेलीत ती पॅक करून पाठवावी लागते. तेथेही ती पुन्हा तपासली जाते, मग ती निर्यात केली जाते. मिरची लागवडीपासून आतापर्यंत जवळपास एक लाख रुपये खर्च झाला असला, तरी त्यापासून मोठे आर्थिक उत्पन्न मिळण्याची शाश्वती निर्माण झाली आहे.” असे शेतकरी आनंद मालकर यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!