Success Story : 24 लाखांची नोकरी सोडली; 200 एकर शेतीतून करतोय कोट्यवधींची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये मागील काही दिवसांपासून अनेक बदल (Success Story) पाहायला मिळतायेत. राज्यातील शेतकरी काही प्रमाणात या बदलांना सामोरे जात, आधुनिक पद्धतीने शेतीतून मोठ्या प्रमाणात नफा कमावत आहे. अशातच सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात करार पद्धतीने शेती करत, काही शेतकरी अधिकाधिक उत्पन्न मिळवत आहेत. आज आपण अशाच एका शेतकऱ्याच्या कंपनीची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी वर्षाला 24 लाख रुपये मिळणाऱ्या नोकरीला रामराम ठोकला. आणि शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी मदत करणारी स्वतःची उभारली. त्यांची कंपनी आज जवळपास 200 एकर शेत जमीनीवर करार पद्धतीने 137 शेतकऱ्यांना सोबत घेऊन, कोट्यवधींची उलाढाल (Success Story) करत आहेत.

वार्षिक 24 लाखांच्या नोकरीला रामराम (Success Story Of Contract Farming)

सचिन काळे असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते हरियाणातील गुडगांव येथे खासगी कंपनीत उच्च पदावर नोकरी करत होते. नोकरीतून चांगली कमाई देखील होत होती. सर्व काही ठीक सुरु असताना, 2013 मध्ये त्यांनी शेतीची वाट धरली. आज ते अनेक तरुण युवकांसाठी प्रेरणास्रोत (Success Story) ठरले आहे. शेतकऱ्यांना सोबत घेऊन करार पद्धतीने शेती करत, ते आज 200 एकर शेतीतून वार्षिक कोट्यवधींची कमाई करत आहे. सचिन हे छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथील रहिवासी असून, त्यांचे आजोबा हे सरकारी कर्मचारी होते. त्यांनी पाहिलेले शेती करण्याचे स्वप्न, आपण पूर्ण करत असल्याचे शेतकरी सचिन काळे सांगतात.

आधुनिक पद्धतीने भाजीपाला लागवड

शेतकरी सचिन काळे यांचे आजोबा वसंतराव काळे यांचे निधन झाल्यानंतर, आजोबांची जवळपास 25 एकर जमीन त्यांच्याकडे आली. तेव्हापासून त्यांनी आपल्या घरच्या काही जमिनीत धान तर काही जमिनीमध्ये आधुनिक पद्धतीने भाजीपाला उत्पादन घेणे सुरु केले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आजूबाजूचे शेतकरी केवळ धानाचे पीक घेतात. मात्र, सचिन आपल्या शेतीत वर्षभर भाजीपाल्याची पिके घेत होते. ज्यातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळत होते. याशिवाय सचिन यांची आधुनिक पद्धतीने भाजीपाला शेती पाहून, अन्य शेतकरी देखील भारावले होते. हीच बाब लक्षात घेऊन सचिन काळे यांनी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानयुक्त आधुनिक शेती करण्यास मदत व्हावी. या उद्देशाने इनोवेटिव एग्रीलाइफ सॉल्यूशंस प्राइवेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली.

शेतकऱ्यांचाही आर्थिक विकास

दरम्यान, शेतकरी सचिन काळे हे सध्या स्वतःच्या घरच्या शेतीसोबतच आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन 200 एकरवर आधुनिक पद्धतीने करार पद्धतिने फळे आणि भाजीपाला शेती करत आहे. ते शेतकऱ्यांना शेतीसाठीची सर्व तंत्रज्ञान पुरवतात. तसेच वेळोवेळी आवश्यक ती मदत करतात. ज्यातून सचिन यांच्या कंपनीची तर ग्रोथ होतच आहे. याशिवाय करार केलेल्या शेतकऱ्यांची देखील आर्थिक प्रगती होत असल्याचे सचिन काळे सांगतात.

करार शेती म्हणजे काय?

करार शेती म्हणजे सोप्या शब्दात शेतकऱ्यांना एक विशिष्ट पीक घेण्यास कंपनीकडून सांगितले जाते. ज्यासाठी कंपनी सर्व आर्थिक आणि तंत्रज्ञान युक्त मदत करते. शेतीसाठी आवश्यक साधने पुरविली जातात. शेतकऱ्यांना त्या माध्यमातून आपल्या जमिनीत केवळ पीक घेऊन, भरघोस उत्पादन घ्यायचे असते. यामध्ये कंपनीकडून आधीच झालेल्या करारानुसार, किमान आधारभूत किमतीने शेतमाल खरेदी केला जातो. भलेही बाजारात संबंधित मालाचे दर कमी असले तरी शेतकऱ्यांना निश्चित दर मिळण्यास मदत होते. याउलट संबंधित पिकाचा दर हा बाजारात हमीवापेक्षा अधिक असेल. तर त्या अधिकच्या फरकाचा शेतकऱ्यांना एक तृतीयांश हिस्सा मिळतो. अर्थात ज्यामुळे शेतकरी आणि कंपनी असा दोघांचा फायदा होत असल्याचे सचिन काळे सांगतात.

error: Content is protected !!