टोमॅटोने शेतकऱ्याला केले मालामाल; 2 एकरात कमावले तब्बल ’20’ लाख रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Success Story : विलास कांबळे यांनी लागवड केलेल्या टोमॅटो उत्पादनाला सुरुवात झाली. त्यांना सुरुवातील पहिल्या तोड्याला 25 रु. दर मिळाला, त्यानंतर दर वाढत जावून 75 रु. दर मिळाला. सध्या त्यांना 70 रु. प्रतिकिलो प्रमाणे दर मिळत आहे. या टोमॅटो प्लॉटमधून अजून दीड महिना टोमॅटोचे उत्पादन मिळेल असे श्री. कांबळे सांगतात. एकरात 40 टन उत्पादन मिळते. कमीत कमी 20 रु. प्रतिकिलो दर मिळाला पाहिजे. विलास कांबळे यांचा टोमॅटो पिकाचे उत्पादन घेण्यासाठी सुमारे दीड लाख रु. खर्च झाला असून आत्तापर्यंत साडेसोळा रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

अजून दीड महिन्यापर्यंत या प्लॉटमधून उत्पादन मिळेल. त्यातून 3 ते 4 लाख रूपयांचे उत्पन्न मिळण्याची त्यांना आशा आहे. एकूण 18 ते 20 लाख रु. उत्पन्न मिळेल असा विलास कांबळे यांना विश्वास आहे. सध्या बाजारात प्रतिकिलो 70 ते 80 रुपये दराने बाजारामध्ये टोमॅटोची विक्री होत आहे. शेतकऱ्यांनी योग्य वेळी बाजारभावाचा, हवामानाचा अंदाज घेऊन पिकांची लागवड केल्यास फायदा होऊ शकतो

शेतकऱ्याला शेती करत असताना दुष्काळ, अवकाळी पाऊस, वीजेची समस्या, पिकांवर येणारे कीड व रोग अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र यातून शेतकरी धीर न सोडता पुन्हा उभा राहत असतो. कमी दर मिळाल्यामुळे टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. मात्र सध्या भाजीपाला पिकांना चांगला दर मिळत आहे.

अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा आपण आज पाहणार आहोत की ज्यांना दोन एकरामध्ये चार महिन्यात साडेसोळा लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. या शेतकऱ्याला टोमॅटो (Tomato ) पिकातून चांगले उत्पन्न मिळाले आहे. पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील शेतकरी विलास कांबळे हे शेतकरी अनेक वर्षांपासून भाजीपाला शेती करीत आहेत.

पिकाची लागवड कशी केली?

विलास कांबळे यांनी 2 एप्रिल 2023 रोजी टोमॅटोच्या रोपांची लागवड केली. पाच बाय सव्वा फुटावर एक रोप लावले. 6242 या वाणाचे रोप लावले. 15000 रोपांमधील 9000 रोपांची तुटाळ झाली त्यामुळे तुटाळ भरून काढण्यासाठी पुन्हा 10000 रोपे लावली. त्यानंतर पुन्हा तुटाळ झाली व पुन्हा 4000 रोपे लावली. उन्हाचा तडाखा बसल्याने रोपांची मर होवून तुटाळ जास्त प्रमाणात झाली असे कांबळे म्हणतात. त्यानंतर तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य ते खत व पाणी व्यवस्थापन केले. पिकाचा जोम वाढला. त्यानंतर झाडाला तारेचा आणि बांबुचा भक्कम आधार दिला.

कोणत्या जमिनीत करावी लागवड

खडकाळ जमिनीत टोमॅटो पिकाचे उत्पादन चांगले येते. तसेच चकाकी येते. पावसाळ्यात लागवड करताना पाण्याचा निचरा असणारी जमीन निवडावी. मल्चिंग केल्यास रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

.

error: Content is protected !!