Success Story : दीड बिघ्यात गुलाबाची लागवड; 2 लाखांच्या कमाईचा शेतकऱ्याने असा बनवला प्लॅन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये फुलशेती (Success Story) करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्यात लग्न समारंभ, पावसाळ्यात गणपती, दसरा आणि त्यानंतर दिवाळीचा काळ असल्याने बाजारात फुलांना मोठी मागणी असते. इतकेच नाही प्रत्येक सणासुदीला धार्मिक पूजापाठ कारण्यासाठी फुलांना बाजारात नेहमीच मागणी असते. ज्यामुळे फुलांच्या शेतीतून शेतकऱ्यांना मोठी आर्थिक कमाई होते. आज आपण अशाच एका फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. जे आपल्या दीड बिघा गुलाब शेतीतुन (Success Story) खर्च वजा जाता 2 लाखांचा निव्वळ नफा मिळवत आहे.

पारंपारिक पिकांना फाटा (Success Story Of Gulab Farming)

राजेश कुमार असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तरप्रदेशातील कन्नौज जिल्ह्याच्या बौरापुर गावचे (Success Story) रहिवासी आहेत. ते यापूर्वी बटाटा आणि मका या पारंपरिक पिकांचे उत्पादन घेत होते. मात्र, त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी फुलशेतीकडे वळण्याचा मार्ग निवडला. त्यानुसार त्यांनी गुलाब फुलाची निवड करून, आपल्या दीड बिघा शेतीत लागवड केली आहे. ते सांगतात दरवर्षी आपल्याला नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत एक टप्प्यात तर मार्च ते ऑक्टोबर दुसऱ्या टप्प्यात असे दोन टप्प्यात उत्पादन मिळते. गुलाब फुलाच्या लागवडीसाठी रोपांसाठी धावाधाव करावी लागत नाही. आपल्या जवळच्या नर्सरीमध्ये रोपे अगदी सहजपणे उपलब्ध होतात. असे ते सांगतात.

किती मिळतोय दर?

शेतकरी राजेश कुमार सांगतात, गुलाब फुलाची लागवड केल्यानंतर त्यांच्या विक्रीसाठी एक विशिष्ट योजना बनवणे खूप आवश्यक असते. ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळण्यास मदत होते. यामध्ये शेतकरी आपल्या जवळच्या फुलांच्या दुकानांसोबत, हॉटेल, लग्न समारंभाचे कंत्राटदार, मंगल कार्यालय किंवा मग अशा अन्य ग्राहकांसोबत थेट संपर्कात राहून विक्री करू शकतात. याशिवाय मोठ्या शहरांमध्ये बाजार समितीत गुलाब फुले पाठवणे हा पर्याय तर केव्हाही उपलब्ध असतो. सर्वसाधारणपणे आपल्या विक्रीच्या याच योजनेमुळे एकूण हंगामात आपल्याला सरासरी 100 ते 150 रुपये किलोचा दर सहज मिळत असल्याचे ते सांगतात.

किती मिळतंय उत्पन्न?

शेतकरी राजेश कुमार सांगतात, आपल्याला दीड बिघा शेतीतून वर्षभरात दररोज 5-6 किलो गुलाब (Success Story) फुले सहज मिळतात. यात हंगामाच्या पीक पॉईंटला झाडांना खूप फुले लगडलेली असतात. त्यावेळी उत्पादनात वाढ होते. अर्थात काही न करता आपल्याला गुलाब शेतीतून दररोज 700-800 रुपये कमाई सहज होते. एकदा फुलांची लागवड केल्यानंतर 8 ते 10 वर्ष उत्पादन हमखास मिळते. असे ते सांगतात. अर्थात गुलाब शेतीतून दीड बिघ्यात आपल्याला सर्व खर्च वजा जाता 2 लाखांचे वार्षिक उत्पन्न सहज मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांमध्ये अडकून न पडता अधिकचा नफा देणारी पिके कशी घेता येतील? याकडे कटाक्षाने पाहणे गरजेचे असल्याचे ते शेवटी सांगतात.

error: Content is protected !!