Success Story : नवीन फ्लॉवर वाण विकसित करण्यात यश; भाजीपाला संशोधन संस्थेची किमया!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : फ्लॉवरची भाजी हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध (Success Story) असते. मात्र, उन्हाळाच्या दिवसांमध्ये ही भाजी उपलब्ध होण्यात अडचणी येतात. अशातच आता वाराणसी येथील भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेचे (आयआयव्हीआर) प्रमुख संशोधक अच्युत कुमार सिंह यांनी अनेक वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर नवीन फ्लॉवर वाणाच्या संशोधनात यश मिळवले आहे. त्यांनी उन्हाळाच्या दिवसांमध्ये टिश्यू कल्चर पद्धतीच्या मदतीने फ्लॉवर लागवडीबाबतचे संशोधन यशस्वी केले आहे. लवकरच शेतकऱ्यांना आपल्या संशोधित फ्लॉवरचे बियाणे उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फ्लॉवर लागवडीसाठी (Success Story) बियाणे उपलब्ध होण्यासह, ग्राहकांना देखील उन्हाळयात फ्लॉवरची भाजी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

लवकरच शेतकऱ्यांना बियाणे मिळणार (Success Story Of IIVR New Cauliflower Variety)

भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेचे (आयआयव्हीआर) प्रमुख संशोधक अच्युत कुमार सिंह यांनी आपल्या या संधोधनाबाबत म्हटले आहे की, मागील तीन वर्षांपासून आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फ्लॉवर पिकाचे अधिक क्षमतेने (Success Story) उत्पादन घेता यावे. यासाठी एका विशिष्ट जातीवर काम करत होतो. त्यात आपल्याला यश मिळाले असून, टिश्यू कल्चरच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या या वाणामुळे अधिक तापमानात देखील शेतकऱ्यांना फ्लॉवरची लागवड करता येणार आहे. या फ्लॉवरच्या वाणाची अंतिम चाचणी सुरु असून, तिचे बियाणे लवकरच शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. सध्या मार्च महिन्यातील भर उन्हातही या वाणाचे भरघोस उत्पादन मिळत आहे.

शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीस मदत होणार

केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही बाब लक्षात घेऊन आपण या फ्लॉवरच्या वाणाचे संशोधन केले आहे. या प्रजातीपासून शेतकऱ्यांना कमी कालावधीत अधिक उत्पादन मिळण्यास मदत होणार आहे. वाराणसी येथील भाजीपाला संशोधन संस्थेचे एकूण 42 भाजीपाला वाणांवर काम सुरु असून, संस्था शेतकरी केंद्रित भाजीपाला वाणांचे संधोधन करण्यावर भर देत आहे. ज्यामुळे संस्थेच्या संशोधित भाजीपाला वाणांमुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवण्यास मदत होत आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

किती मिळू शकते उत्पन्न?

विशेष करून हिवाळ्याच्या दिवसांमध्ये फ्लॉवर लागवडीतून (Success Story) शेतकऱ्यांना प्रति एकर 50 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. अर्थात बाजारभावानुसार शेतकऱ्यांना एकूण प्रति एकरी मिळणाऱ्या निरोगी फ्लॉवर गड्ड्यांपासून साधारणपणे 4 लाखांपर्यंतचे उत्पादन मिळू शकते. या नवीन प्रजातीच्या लागवडीतून उन्हाळयाच्या दिवसांमध्ये यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेचे (आयआयव्हीआर) प्रमुख संशोधक अच्युत कुमार सिंह यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!