हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या सर्वच शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने, शेतकऱ्यांनी पिकांचे उत्पादन घेण्यासह (Success Story) त्यावर प्रक्रिया करण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक भागात काही शेतकरी शेतमालावर प्रक्रिया करून अधिकचा नफा मिळवताना दिसतात. छत्रपती संभाजीनगरच्या शेतकरी रशीद शेख यांनी देखील असाच काहीसा मार्ग निवडला असून, त्यांनी आपल्या शेतात उत्पादित उसापासून पाच वर्षांपूर्वी गूळनिर्मिती करण्यास सुरुवात केली. त्यांनी सध्या या व्यवसायात चांगले पाय रोवले असून, ते वार्षिक मोठी कमाई देखील करत आहे. आज आपण शेतकरी रशीद शेख यांच्या गूळनिर्मिती व्यवसायाची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत.
अनुभवाचा सुयोग्य वापर (Success Story Of Jaggery Business)
शेतकरी रशीद शेख यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने एका उसाच्या गुऱ्हाळात (Success Story) त्यांनी बरीच वर्ष काम केले. तसेच घरच्या शेतीत ते पारंपरिक पिकांची लागवड करत होते. मात्र त्या रोजंदारीतुन त्यांना घर चालवणे अवघड जात होते. त्यामुळे त्यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी उपलब्ध पाण्यात पारंपरिक पिकांसह ऊस लागवड केली. लागवडीनंतर रोजंदारीवरील अनुभवाचा उपयोग करून घेत, त्यांनी आपल्या राजाराय टाकळी गावात पाच वर्षांपूर्वी गुऱ्हाळ उभारले. आज ते त्याद्वारे लाखोंची उलाढाल करत आहे.
गावातील शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी
शेतकरी रशीद शेख यांचा गुऱ्हाळाच्या माध्यमातून गूळ निर्माण करण्याचा व्यवसाय सध्या चांगलाच बहराला असून, ते प्रामुख्याने नोव्हेंबर ते मे या कालावधीत हा व्यवसाय चालवतात. शेतकरी रशीद शेख हे प्रामुख्याने आपल्या शेतातील उसासह गावातील काही शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करतात. त्यानंतर ते आपल्या गुऱ्हाळात ऊस आणून, त्याद्वारे रस काढून त्यात भेंडीचा रस, एरंडाचे तेल व काही घटक मिक्स करून विविध किलोच्या आकारामध्ये गुळाची निर्मिती करतात.
किती मिळते उत्पन्न?
शेतकरी रशीद शेख हे दररोज 4.5 टन उसापासून रस काढून, त्याद्वारे दैनिक पाच क्विंटल गुळनिर्मिती करतात. त्यांचे हे गुऱ्हाळ जवळपास सात महिने चालते. त्यांच्या गुऱ्हाळावर चार लोक दररोज काम करतात. त्यांच्याकडे सध्या 1,5,10 वजनात गूळ उपलब्ध आहे. तसेच ते 50 रुपये किलोने दराने आपला गूळ विक्री करतात. यातून वार्षिक लाखोंची उलाढाल करत असल्याचे शेतकरी रशीद शेख सांगतात. याशिवाय आपल्या गुऱ्हाळात तयार झालेली गुळाची काखी 100 रुपये प्रति लिटर दराने विक्री करतात. त्यातूनही अतिरिक्त कमाई होत असल्याचे ते सांगतात.