Success Story : 2 म्हशींपासून सुरु केला दुग्ध व्यवसाय; आज 40 म्हशींचा गोठा, महिन्याला 3 लाख कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जिद्द चिकाटी आणि प्रामाणिक कष्टांच्या जोरावर आपण कोणत्याही व्यवसायामध्ये (Success Story) यशस्वी होऊ शकतो. हीच गोष्ट जालना जिल्ह्यातील शहापूरकर कुटुंबाने दाखवून दिली आहे. या कुटुंबाने 40 म्हशींच्या पालनातून महिन्याकाठी 3 लाखांचा निव्वळ नफा मिळवत दुग्ध व्यवसायात यशाचा पायंडा घालून दिला आहे. विशेष म्हणजे डेअरी व्यवसाय हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय असल्याने, त्यांच्या तीन पिढ्या या व्यवसायातून समृद्ध झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज आपण शहापूरकर कुटुंबाच्या यशस्वी दुग्ध व्यवसायाबद्दल (Success Story) जाणून घेणार आहोत.

वडिलोपार्जित व्यवसायात गुंतले कुटुंब (Success Story Of Jalna Dairy Farmer)

मूळचे सोलापूरचे असलेले शहापूरकर कुटुंब 1960 च्या दशकात जालन्यात स्थायिक झाले. किरण शहापूरकर यांचे आजोबा जालना जिल्ह्यातील निधोना येथे वास्तव्यास आले. त्यांनी केवळ दोन पंढरपुरी म्हशींपासून दुग्ध व्यवसायाला (Success Story) सुरुवात केली. या व्यवसायात पुढे किरण यांच्या वडिलांनीही योगदान दिले. आता त्यांच्या तीन नातवांनी दुग्ध व्यवसाय वाढवला असून, आपला गोठा तब्बल 40 म्हशींपर्यंत विस्तारला आहे. ज्यातून सध्या त्यांना 40 म्हशींच्या पालनातून महिन्याकाठी 3 लाखांचा निव्वळ मिळत असल्याचे किरण शहापूरकर सांगतात.

किती मिळते मासिक उत्पन्न?

किरण शहापूरकर सांगतात, आपल्या गोठ्यातील 40 म्हशींपासून दररोज 150 ते 200 लिटर दूध निघते. हॉटेल व्यवसायिक तसेच घरगुती ग्राहकांना 70 ते 80 रुपये प्रति लिटर या दराने या दुधाची विक्री होते. दोन दिवसाला 12 ते 15 हजार रुपये मिळतात. म्हशींसाठी लागणारा चारा आणि इतर खर्च वगळून दहा हजार रुपये निव्वळ हातामध्ये राहतात. अशाप्रकारे महिन्याकाठी निव्वळ तीन लाखांचे उत्पन्न शहापूरकर बंधू कमावत (Success Story) आहे. या उत्पन्नातूनच एक टुमदार घरही बांधल्याचे ते सांगतात.

कसे करतात दैनिक नियोजन?

किरण शहापूरकर सांगतात, आमच्या आजोबांनी हा व्यवसाय सुरू केला आणि आम्ही हा व्यवसाय वाढवत नेला. या व्यवसायामध्ये स्वतः काम करावे लागते. इतरांच्या भरोशावर हा व्यवसाय चालत नाही. सकाळी चार वाजता उठून आम्ही म्हशींचे शेण काढणे, त्यांना वैरण देणे तसेच दूध काढण्याचे काम करतो. त्यानंतर एक जण जालना शहरात दुधाची विक्री करण्यासाठी जातो.

सकाळी दहा वाजेपर्यंत म्हशींची सगळी कामे आवरतात. 10 वाजेच्या आसपास त्यांना पाणी दिले जाते. त्यानंतर दुपारी 3 वाजता त्यांची वॉशिंग केली जाते. पुन्हा संध्याकाळच्या नियोजनात सुरुवात होते. संध्याकाळी पुन्हा एकदा वैरण टकणे दूध काढणे अशा प्रकारचे नियोजन असते, असे किरण शहापूरकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!