Success Story : कृषी पदवीधर तरुणाची अनोखी शेती; 3 एकरात खपली गव्हाची यशस्वी लागवड!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत सुशिक्षित तरुण शेतीमध्ये क्रांती (Success Story) घडवून आणत आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एका पदवीत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणाने देखील असाच काहीसा आगळावेगळा प्रयोग केला आहे. त्याने आपल्या ३ एकर शेतीमध्ये खपली प्रजातीचा गहू पेरला आहे. विशेष म्हणजे खपली गहू आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून, सध्याच्या हायब्रीड बियाण्याच्या जमान्यात तरुणाने या गव्हाची सेंद्रिय पद्धतीने यशस्वी लागवड (Success Story) केली आहे. या तरुणाने विषमुक्त शेतीच्या दिशेने टाकलेल्या पावलाची सध्या सर्व स्तरात चर्चा होत आहे.

कृषी क्षेत्रात उच्च शिक्षण (Success Story Of Khapli Wheat Farming)

कृष्णा भालेराव असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, त्याने परभणी येथील कृषी विद्यापीठातून बीएस्सी (ऍग्री) आणि एमएस्सी (वनस्पतीशास्त्र) पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. कोरोनाकाळानंतर लोक आरोग्याच्या दृष्टीने खूप सजग झाले आहेत. हीच बाब लक्षात घेऊन या तरुणाने सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा निर्णय हा घेतला. यासाठी त्याने पारंपरिक पिकांना फाटा देत खपली प्रजातीच्या गव्हाची पेरणीसाठी निवड केली. विचारांती त्याने जुनी परंपरा असलेले MSCS 2971 (T. Dicoccum) हे खपली गव्हाचे बियाणे पेरणीसाठी उपलब्ध केले.

पेरणीपूर्वीची मशागत

कृष्णा भालेराव यांने गहू पेरणीपूर्वी आपल्या तीन जमिनीत चांगली मशागत करून घेतली. त्यानंतर चांगले कुजलेले 10 बैलगाड्या शेणखत टाकले. सूक्ष्म अन्नद्रव्य, ट्रायकोडर्मा जिवाणू व गांडूळ खत 50 किलो सोबत मिसळून जमिनीत चांगले मिसळून घेतले. आणि त्यानंतर आणलेल्या बियाण्याला ट्रायकोडर्मा पाच ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीजप्रक्रिया करून पेरणी केली. सध्या कृष्णा भालेराव याचा गहू जोमात असून, लवकरच तो काढणी येणार आहे. कृष्णाला आपल्या तीन एकरात ४५ ते ५० क्विंटल गव्हाचे उत्पादन होण्याची अपेक्षा होण्याची अपेक्षा आहे.

किती मिळणार नफा?

खपली गव्हाला उच्चभ्रू लोकांमध्ये मोठी मागणी असते. तसेच त्याला साधारण गव्हापेक्षा चारपट अधिक भाव मिळतो. त्यामुळे प्रति क्विंटल १० हजार रुपयांच्या दरानुसार कृष्णा भालेराव यास आपल्या तीन एकरात ४५ ते ५० क्विंटल गहू उत्पादनातून साधारणपणे खर्च वजा जाता साडेतीन लाख रुपये निव्वळ नफा होण्याची अपेक्षा असल्याचे तो सांगतो. या गव्हाला आयुर्वेदिक महत्व असल्याने, अनेक आजारांवर डॉक्टर खपली गव्हाच्या चपात्या खाण्याचा सल्ला देतात.

खपली गव्हाची प्रमुख वैशिष्ट्ये :

  • खपली गहू प्रामुख्याने पौष्टिक, वात-पित्तशामक, शक्ती वाढवणारा आहे.
  • खपली मधुमेह, हृदयविकार, आतड्यांचा कर्करोग, बद्धकोष्टता, हाडांची झीज भरून काढणारा, दातांच्या तक्रारी इत्यादी आजारांत आहारासाठी योग्य आहे.
  • खपली पचावयास हलका आहे. शेवया, कुरडया, बोटुकली, खीर, रवा, पास्ता इ. पदार्थ बनवले जातात.
  • या गव्हापासून बनवलेली चपाती/पोळ्या चवीला इतर गव्हाच्या जातीपेक्षा गोडसर असतात.
  • या गव्हामध्ये 12 ते 15 टक्के प्रथिने, 78 ते 83 टक्के कर्बोदके आणि तंतूचे प्रमाण 16 टक्के आहे.
  • काळी, कसदार तसेच हलक्या, चोपण जमिनीमध्ये लागवड करता येते.
  • या गव्हात ग्लुटेनची मात्रा अतिशय कमी आहे. त्यामुळे मधुमेही रुग्णांना हा गहू उपयुक्त आहे.
error: Content is protected !!