Success Story : सध्या अनेक तरुण वर्ग चांगल्या पगाराची नोकरी सोडून आपल्याला शेती करताना दिसत आहे. त्याचबरोबर पशुपालनाला देखील तरुण वर्ग प्राधान्य देत असल्याचे दिसत आहेत. अनेक तरुण हे दूध व्यवसाय करून चांगला नफा देखील मिळवत आहेत. चांगले शिक्षण घेऊन तंत्रज्ञानाचा वापर करून हे शेतकरी तरुण चांगला नफा कमवत आहेत. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील चिंचवली या छोट्याशा गावातील मंदार पेडणेकर या तरुणांनी वडिलोपार्जित जमिनीवर पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू केला आहे. मंदार यांने मुंबईमध्ये एमबीएच शिक्षण घेतलं मात्र नोकरी मिळत नसल्यामुळे त्यांने हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
त्याने त्याच्या मूळ गावी म्हणजे चिंचवली येथे पोल्ट्री फार्म सुरू करण्याचा निर्णय घेतला. वडिलोपार्जित दीड एकर जमिनीमध्ये त्यांने पोल्ट्री फार्म उभारला त्याने आठ गुंठ्यांमध्ये शेड उभारून दहा हजार कोंबडी असलेला लेहर पोल्ट्री उद्योग गावात सुरू केला. त्यामुळे सध्या या तरुण युवकाचे सगळीकडे कौतुक होत आहे. (Success Story )
60 ते 65 लाख रुपये खर्च
कोंबड्यांचा लेहर पोल्ट्री उद्योग उभारण्यासाठी या तरुणाला जवळपास 60 ते 65 हजार लाख रुपये खर्च आला आहे. त्याचे वडील सरकारी कर्मचारी होते त्यावेळी त्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळाल्या रकमेतून त्याने हा प्रोजेक्ट उभा केला असल्याची माहिती दिली आहे. वडिलांच्या पुपुण्याईमुळे मंदार हा व्यवसाय करून शकला असल्याचे देखील बोलले जात आहे
वडिलांचे अचानक निधन
त्याला हा व्यवसाय सुरू करण्यामध्ये त्याच्या वडिलांची मोठी साथ होती मात्र वडिलांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारत असतानाच वडिलांचं अचानक निधन झालं. त्यामुळे त्याच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळा मात्र त्यात खचून न जाता तरुणांने त्यामधून सावरून पुन्हा हा व्यवसाय उभा करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आणि हा व्यवसाय सुरू केला.
लेहर पोल्ट्री उद्योगांमध्ये आज दहा हजार पक्षी आहेत
कोंबड्यांच्या लेहर पोल्ट्री उद्योगांमध्ये आज जवळपास दहा हजार पक्ष आहेत. या दहा हजार कोंबड्यांपासून त्याला 9200 अंडी दिवसाला मिळतात. त्यामुळे या अंड्यापासून महिन्याला एक ते दीड लाख रुपये मिळवतो. त्याच्या पोल्ट्रीवर सहा कामगार काम करत आहेत आपण दुसऱ्यांना देखील काम देऊ शकलो याचा अभिमान या तरुणाला वाटत आहे.
कोंबड्यांचे खाद्य स्वतःच बनवतो
बरेच जण पोल्ट्री फार्म टाकला तरी कोंबड्यांसाठी लागणार खाद्य बाहेरून मागवत असतात. त्यामुळे जास्त नफा राहत नाही मात्र हा तरुण स्वतःच खाद्य बनवतो. मका, सोयाबीन पेंड, स्टोन ग्रीड तसेच मेडिसिनमध्ये विविध घटक मिक्स असतात. कच्चे खाद्य बाहेरून मागवले जातात कोंबड्यांना दिवसाला जवळपास एक टन खाद्य लागते. एका कोंबडी बद्दल पाहिले तर दिवसाला एक कोंबडी जवळपास 100 ते 120 ग्रॅम खाद्य खाते.
दीड लाख निव्वळ नफा मिळतो
त्याचा आर्थिक गणित पाहिलं तर त्याच्याकडे जवळपास दहा हजार कोंबड्या आहेत. यामधून त्याला दिवसाला नऊ हजार दोनशे अंडे मिळतात प्रत्येक अंड 3.5 ते 4.5 या दराला विकले जाते. स्थानिक बाजारपेठेतील व्यापारी अंड घेऊन जातात त्यामुळे दिवसाला अंड्यापासून जवळपास 35 ते 36 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते तर महिन्यासाठी अकरा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यामध्ये पक्षांच्या खाद्यासाठी लागणारा कच्चामाल बनविणे कामगारांचे पगार, पक्षांसाठी लागणारे औषध या सर्वांचा खर्च वजा करून त्या युवकाला दीड लाख निव्वळ नफा मिळतो.