Success Story : 20 वर्षांपासून खरबूज शेती, एकरी मिळवतायेत 15 टनांपर्यंत उत्पादन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अनेक शेतकऱ्यांना उन्हाळ्याचे दिवसात चांगले पाणी (Success Story) असते. ज्यामुळे शेतकरी काही शेतकरी बारमाही आलटून पालटून पिके घेत चांगले उत्पन्न घेत असतात. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीबेल गावचे शेतकरी बाळकृष्ण व दीपक या पाचपुते या दोघा भावांनी देखील गेल्या २० वर्षांपासून खरबूज शेतीच्या माध्यमातून मोठी प्रगती साधली आहे. विशेष म्हणजे पुण्यासह दिल्लीपर्यंत अर्थात संपूर्ण देशभरातील बाजारात त्यांचे खरबूज जातात. ज्यामुळे त्यांना अधिकचा दर मिळून ते दरवर्षी खरबूज पिकातून लाखोंची कमाई (Success Story) करत आहे.

20 वर्षांचा गाढा अनुभव (Success Story Of Muskmelon Farming)

खरबूज पिकाला वर्षभर बाजारात मागणी असते. जानेवारी- फेब्रुवारी हा लागवडीचा मुख्य उन्हाळी हंगाम, एप्रिलमध्येही लागवड होते. याशिवाय ते नोव्हेंबरच्या दरम्यान खरबूज मार्केटला येईल, या पद्धतीनेही लागवडीचा खरिपातील महिना निवडतात. त्यानुसार वर्षभरातील लागवडीचे हंगाम त्यांनी निश्‍चित असून, खरबूज लागवडीसाठी (Success Story) सुधारित तंत्रज्ञानावर भर दिला जात आहे. या पिकात सुमारे २० वर्षांचा गाढा अनुभव निर्माण करून त्यात दोघा भावांनी कौशल्य संपादन केले आहे.

सेंद्रिय पद्धतीचा वापर

पाचपुते बंधूंनी खरबूज लागवडीसाठी (Success Story) दोन जातींची करतात. लागवडीसाठी ते झिगझॅग पद्धतीचा वापर करतात. ज्यासाठी त्यांना एकरी सुमारे सात हजार रोपे लागतात. काही वेळा नर्सरीतून ती आणली जातात. काही वेळा रोपे घरीही तयार केली जातात. असे ते सांगतात. खरबुजाचे भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी ते शेणखत, कोंबडीखताच्या वापरावर अधिक भर देतात. ज्यासाठी त्यांनी घरी १० गीर गायी पाळल्या आहेत. ज्या माध्यमातून ते दशपर्णी अर्क, गांडूळ खत, व्हर्मिवॉश, भूसुधारक स्लरी, जिवामृत व वेस्ट डी-कंपोजर आदींचा वापर करतात.

किती मिळतो दर, उत्पन्न?

पाचपुते बंधू सांगतात, उन्हाळ्यात सुमारे ६५ दिवसांत पीक काढणीस येते. थंडीत हा कालावधी ८० दिवसांपर्यंत जातो. एकरी सरासरी १० टनांपासून ते १५ टनांपर्यंत उत्पादन मिळते. काही वेळा त्यापुढेही उत्पादन घेतले आहे. काढणी केल्यानंतर बॉक्समध्ये पॅकिंग करून विक्रीसाठी खरबूज पाठवले जाते. वर्षभराचा विचार केल्यास किलोला १८ ते २० रुपये दर मिळतो. उन्हाळ्यात तो थोडा जास्त व रमजान काळात तो त्याहून अधिक असल्याचे ते सांगतात. अर्थात वर्षातील चार ते पाच वेळा प्रत्येकी दोन ते तीन एकरांत लागवड होत असल्याने बारमाही खरबूज त्यांच्या शेतात असते. ज्यातून त्यांना वार्षिक लाखोंची कमाई होत असल्याचे ते सांगतात.

error: Content is protected !!