Success Story : केळीमध्ये खरबुजाचे आंतरपीक; नांदेडच्या शेतकऱ्याची लाखोंची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकऱ्यांना एकाच पिकावर अवलंबून राहायचे (Success Story) म्हटले तर शेती तोट्यात जाते. कारण बाजारात कधी कोणत्या मालाचे दर पडतील? याची काही शाश्वती नसते. त्यामुळे राज्यातील अनेक भागातील शेतकरी सध्या आंतरपीक घेत एकाच वेळी एकाहुन अधिक पिकांची लागवड आपल्या शेतात करत आहेत. या बहुविध पिकांच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होते. असाच काहीसा आंतरपीक घेत एकाच वेळी केळी आणि खरबुजाचे उत्पन्न घेण्याचा यशस्वी प्रयोग, नांदेड येथील एका शेतकऱ्याने केला आहे. आज आपण या शेतकऱ्याची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत.

केळीमध्ये खरबुजाचे आंतरपीक (Success Story Of Nanded Farmer)

नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील लहान तांडा येथे शेतकरी बालाजी राठोड (Success Story) यांची शेती आहे. दरवर्षी ते आपल्या शेतात पारंपरिक पद्धतीने प्रामुख्याने केळी, हळद आणि सोयाबीन ही पिके घेत होते. मात्र, वेगवेगळे पीक घेताना त्यांना अवधी जास्त लागत होता. तसेच एका पिकातुन उत्पन्न मिळण्यासाठी अधिकचा वेळ लागत होता. यामुळे त्यांनी आंतरपीक पद्धतीने केळी आणि खरबुजाची एकाच वेळी लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी नोव्हेंबर महिन्यात आपल्या सव्वा दोन एकर जमिनीत केळीची 2900 रोपे तर त्यात आंतरपीक म्हणून खरबुजाची 1600 लावली.

किती मिळाले उत्पन्न?

सध्या त्यांची खरबूज पिकाची तोडणी सुरु असून, केळी पिकाची देखील उत्तम वाढ झाली आहे. आतापर्यंत त्यांना 21 टन खरबुजाचे उत्पादन मिळाले असून, त्यास प्रति किलो 20 ते 25 रुपये दर मिळाला आहे. यानुसार त्यांना केळीतील खरबुजाची आंतरपिकातून 3 तीन लाख रुपये उत्पन्न मिळाले असल्याचे शेतकरी बालाजी राठोड सांगतात. आणखी मागे काही माल शिल्लक असून त्यातूनही काही उत्पन्न मिळणार आहे. असे त्यांना एकूण 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे ते सांगतात.

दरम्यान, शेतकऱ्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता पिकांचे विविधता आणण्याची गरज आहे. एकाच जमिनीत दोन किंवा अधिक पिके घेऊन उत्पादन खर्चही वाचतो. तसेच एका वेळी अधिक पिके घेत मिश्र शेती केल्यास एखाद्या पिकाच्या दरात घसरण झालेली असल्यास, शेतीतून होणार तोटा दुसऱ्या पिकातून भरून निघतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकाधिक मिश्र शेतीचा मार्ग निवडवा, असे आवाहन शेतकरी बालाजी राठोड यांनी शेवटी केले आहे.

error: Content is protected !!