Success Story : वांग्याच्या शेतीतून शेतकऱ्याने दीड एकरात घेतले 3 लाखांचे उत्पन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Success Story : सध्या बरेच शेतकरी आपल्या शेतामध्ये पालेभाज्या पिकवून चांगला लाखोंचा नफा कमवत आहेत. आता टोमॅटोमुळे तर अनेक शेतकरी लखपती ते करोडपती झाल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत. दरम्यान सध्या देखील शेतकऱ्याचे नशीब बदलले आहे. शेतकऱ्याने फक्त दीड एकर वांग्याच्या शेतीतून तीन लाखांचे उत्पन्न घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या शेतकऱ्याची सगळीकडे चर्चा होत असून हा शेतकरी इतर शेतकऱ्यांसाठी एक उदाहरण बनला आहे.

या शेतकऱ्याचे नाव निरंजन सरकुंडे अस आहे. शेतकरी नांदेड या ठिकाणचा रहिवासी आहे. निरंजन यांचे भाजीपाला लागवडीमुळे नशीबच बदलले आहे. निरंजन सरकुंडे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे खूप कमी जमीन आहे. त्यांनी फक्त दीड बिघा जमिनीवर वांग्याची लागवड करत भरघोस उत्पन्न मिळवले आहे. त्यांनी वांग्याची लागवड केली असून त्यातून त्यांना आतापर्यंत जवळपास चार लाखांचे उत्पन्न मिळाले आहे त्यामुळे सगळीकडे यांची चर्चा होताना दिसत आहे. (Success Story)

निरंजन सरकुंडे हे संपूर्ण गावासाठी उदाहरण बनले असून आता त्यांच्या शेजारच्या गावातील शेतकरी देखील त्यांना पाहून भाजीपाला लागवड करत आहेत त्याचं कारणही असंच आहे दीड बिघा जमिनीत वांग्याची लागवड करून निरंजन यांनी जवळपास तीन लाख रुपयांचा निव्वळ नफा कमवला आहे त्यामुळे त्यांची चर्चा होत आहे.

असा चेक करा शेतमालाचा रोजचा बाजारभाव?

शेतकरी मित्रांनो आता आपल्या जवळच्या कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव चेक करणे अगदी सोपे झाले आहे. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड लागेल. या ठिकाणी तुम्हाला रोजच्या बाजारभावाची माहिती मिळेल त्याचबरोबर हवामान अंदाज, जमीन मोजणी, जमीन खरेदी विक्री, सरकारी योजना इत्यादी गोष्टींचा फायदा घेता येतो. त्यामुळे आजच Hello Krushi हे अँप डाउनलोड करा.

error: Content is protected !!